टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा याच्या लग्नाचा सातवा वाढदिवस आहे. रविंद्रने 17 एप्रिल 2016 मध्ये रीवा सोलंकी हीच्यासोबत सप्तपदी घेतल्या होत्या.
जडेजाची पत्नी रिवा सोलंकी ही त्याच्या बहिणीची खास मैत्रीण आहे. एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली. जडेजाच्या बहिणीने दोघांची ओळख करुन दिली. त्यानंतर रविंद्र आणि रीवा यांच्यातील रिलेशनला सुरुवात झाली.
रीवाने राजकारणात आपलं नशिब आजमावलं. रीवाने लोकसभा निवडणूक 2019 आधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. रीवाने 3 वर्षांनंतर जामनगर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती जिंकूनही आली.
रविंद्र जडेजा आणि रिवा यांच्या लग्नात हवेत गोळीबार झाला होता. त्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली होती. दोघांचा विवाह हा आयपीएलदरम्यान झाला होता. जडेजा तेव्हा गुजरात लायन्स टीमचा भाग होता.
रीवा सोलंकी हीने मेकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. जडेजा आणि रिवा या दोघांना कन्यारत्न प्राप्त झालं. या दोघांच्या मुलीचं नाव निधयाना असं आहे.