बीसीसीआय निवड समितीने गेल्या अनेक महिन्यांमध्ये अनेक खेळाडूंकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं की काय , अशी शंका क्रिकेट विश्वात व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयने अनेक खेळाडूंना टीम इंडियातून बाहेरचा रस्ता दाखवलाय. यामध्ये वेगवान गोलंदाज हर्षल पटेल याचा समावेश आहे. आता हर्षल पटेल याला टीम इंडियात संधी मिळण्याची चिन्हं तरी नाहीत.
त्यामुळे हर्षल पटेल याला नाईलाजाने निवृत्तीचा टोकाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. हर्षलने आपला अखेरचा सामना हा जानेवारी 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध खेळला होता. हर्षलला त्या टी 20 मालिकेनंतर संधी देण्यात आली नाही.
हर्षलने आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी करत निवड समितीला टीम इंडियात संधी देण्यासाठी भाग पाडलं होतं. मात्र 25 टी 20 सामन्यानंतर हर्षलला दुर्लक्षित करण्यात आलंय. हर्षललने 25 टी 20 सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत.
हर्षललने या 25 मधील शेवटच्या 12 टी 20 सामन्यात 5 वेळा 40 पेक्षा अधिक धावा दिल्या आहेत. त्यामुळे निवड समितीनेही हर्षलवर पुन्हा विश्वास दाखवला नाही.
टीम इंडियात आता मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, अर्शदीप सिंह यासारखे तोडीसतोड बॉलर आहेत. त्यामुळे आता हर्षलला येत्या काळात टीम इंडियात संधी मिळते की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.