Team India | टीम इंडियाच्या बॉलरची शस्त्रक्रिया, त्याला अशा स्थितीत पाहवणार नाही!
Indian Cricket Team | टीम इंडियाच्या अनुभवी गोलंदाजांवर शस्त्रक्रिया पार पडली आहे. शस्त्रक्रियेनंतर खेळाडूची झालेली अवस्था क्रिकेट चाहत्यांना पाहवणारी नाही. त्या खेळाडूचे फोटो अस्वस्थ करणारे आहेत.
1 / 5
टीम इंडियाचा स्टार आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर टाचेवर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली आहे. मोहम्मद शमीने शस्त्रक्रियेनंतर सोशल मीडियावर फोटो शेअर करत याबाबतची माहिती दिली आहे.
2 / 5
"मी यातून रिकव्हर होत आहे. यातून पूर्णपणे बरा होण्यासाठी वेळ लागेल. मात्र मी पुन्हा कमबॅक करेन", असा विश्वास शमीने या पोस्टमधून व्यक्त केला आहे.
3 / 5
मोहम्मद शमीला आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनल सामन्यादरम्यान दुखापत झाली होती. मात्र शमी त्याच दुखापतीसह टीम इंडियासाठी खेळला. त्यानंतर तो एकही सामन्यात खेळला नाही.
4 / 5
शमीने सोशल मीडियावर शस्त्रक्रियेनंतर काही फोटो शेअर केले आहेत. शमीला कायम मैदानात जल्लोष करतानाचे फोटो पाहण्याची क्रिकेट चाहत्यांना सवय आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या खेळाडूला अशा अवस्थेत क्रिकेट चाहच्यांना पाहवत नाहीये.
5 / 5
दरम्यान मोहम्मद शमी याला या शस्त्रक्रियेमुळे आगामी आयपीएलच्या 17 व्या मोसमातून खेळता येणार नसल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच तो टी 20 वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, याबाबतही साशंकता आहे.