टीममेटच्या बहिणीच्या प्रेमात रोहित ‘क्लिन बोल्ड’, अशी झाली हिटमॅन-रितीकाच्या लव्हस्टोरीची ‘ओपनिंग’
Rohit Sharma Love Story : रोहित शर्माची लव्हस्टोरी भन्नाट आहे. रोहित शर्मा टीम इंडियातील सहकाऱ्याच्या बहिणीच्या प्रेमात पडला आणि तिच्यासोबतच नव्या इनिंगची 'ओपनिंग' केली.
1 / 6
रोहित शर्मा आयपीएलच्या 17 व्या मोसमात मुंबईसाठी खेळाडूच्या भूमिकेत आहे. मुंबई आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सामना हा पंजाब किंग्स विरुद्ध खेळणार आहे. रोहितच्या आयपीएल कारकीर्दीतील हा 250 वा सामना असणार आहे.
2 / 6
या निमित्ताने आपण रोहितची लव्ह स्टोरी जाणून घेऊयात. रोहित शर्मा सिक्सर किंग युवराज सिंह याच्या बहिणीवर भाळला होता. रोहितची पत्नी रितीका ही युवराजची बहिण आहे.
3 / 6
रोहितला सपोर्ट करण्यासाठी रितीका प्रत्येक सामन्याला हजर असते. रितीका आणि रोहितच्या लव्ह स्टोरीची 'ओपनिंग'कशी झाली हे जाणून घेऊयात.
4 / 6
रितीकाने स्पोर्ट्स मॅनेजर म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. रोहित शर्मा आणि युवराज सिंह हे दोघे रितीकाचे क्लायंट होते. युवराज रितीकाला ताई बोलायचा. रितीका युवराजला राखी बांधायची.
5 / 6
रितीका रोहितसह मॅनेजर म्हणून एकत्र काम करायची. या निमित्ताने दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीचं रुपांतर नेहमीप्रमाणे प्रेमात झालं. रोहित-रितीकाने एकमेकांना लग्नाआधी 6 वर्ष डेट केलं. त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.
6 / 6
रोहितने रितीकाला बोरीवली स्पोर्ट्स क्लबमध्ये गुडघ्यावर बसून फिल्मी स्टाईल प्रपोज केल्याचं म्हटलं जातं. इथूनच रोहित-रितीकाच्या नव्या इनिंगची 'ओपनिंग' झाली.