Rohit Sharma: रोहितला बॅटवर स्टीकर लावण्यासाठी किती कोटी मिळतात?
Rohit Sharma Bat Sticker : रोहित शर्माला बीसीसीआयकडून वार्षिक 7 कोटी रुपये मिळतात. मात्र रोहितची त्यापेक्षा अधिकची कमाई ही बॅटवर लावलेल्या स्टीकरमधून होते.
1 / 6
रोहित शर्माने टीम इंडियाला 17 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रोहित आता वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करतो. रोहितला बीसीसीआयकडून वार्षिक करारानुसार 7 कोटी मिळतात. तसेच रोहित इतर माध्यमातूनही कमाई करतो.
2 / 6
रोहितने आतापर्यंत कसोटी, वनडे आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये मिळून 19 हजारांपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहित ज्या बॅटने या धावा करतो, त्यावर सीएट या कंपनीचं स्टिकर आहे. मात्र रोहितला त्या बॅटवर स्टिकर लावण्यासाठी किती रक्कम मिळते माहितीय? जाणून घेऊयात.
3 / 6
सीएट ही एक टायर निर्माती कंपनी आहे. सीएट कंपनीने 2015 साली रोहितसोबत पहिल्यांदा करार केला होता. तेव्हापासून रोहितच्या बॅटवर सीएटचं स्टिकर पाहायला मिळत आहे.
4 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार,रोहितला बॅटवर सीएट कंपनीचं स्टीकर लावण्यासाठी वार्षिक 4 कोटी रुपये मिळतात. साधारणपणे कंपनी आणि खेळाडूत 3 वर्षांसाठी करार होतो. त्यानुसार रोहितला 12 कोटी रुपये मिळतात.
5 / 6
टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली याच्या बॅटवर एमआरएफ कंपनीचं स्टिकर असतं. मीडिया रिपोट्सनुसार, विराटला रोहितच्या तुलनेत तिप्पट रक्कम मिळते.
6 / 6
रोहित शर्मा टी 20i निवृत्तीनंतरही वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्येही सीएट स्टिकर असलेल्या बॅटनेच खेळत आहे. रोहित आयपीएलमध्येही याच स्टिकर असलेल्या बॅटने खेळतो.