टीम इंडियाने श्रीलंकावर 10 विकेट्सने विजय मिळवत आशिया कप 2023 ट्रॉफी जिंकली. टीम इंडिया सर्वाधिक 8 वेळा आशिया कप जिंकणारी टीम ठरली.
आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया भारतात दाखल झाली आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचे फोटो व्हायरल झाले आहेत.
विराट आणि रोहित शर्मा हे दोघे सफेद टी शर्टमध्ये दिसत आहेत. या दोघांचा फोटो व्हायरल झाला आहे. विराट आधी बाहेर आला. त्यानंतर विराट गाडीत बसला.
व्हायरल फोटोंमध्ये रोहित-विराट व्यतिरिक्त इतरही खेळाडू दिसत आहेत. इतर खेळाडू हे कारमध्ये बसल्याचं दिसत आहे.
टीम इंडियाने आशिया कप फायनल 2023 मध्ये श्रीलंकेचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराज याने धमाकेदार बॉलिंग केली.
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन हा काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये दिसत आहे. तसेच यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह हा कारमध्ये असल्याचं दिसतंय.
टीम इंडियाने आधी श्रीलंकेला 15.2 ओव्हरमध्ये 50 धावांवर ऑलआऊट केलं. तर त्यानंतर अवघ्या 6.1 ओव्हरमध्येच 51 धावांचं आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.