Hardik Pandya: हार्दिकचं लग्नाआधी या अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं नावं, पाहा फोटो
Hardik Pandya: हार्दिक पंड्या 2020 साली अभिनेत्री मॉडेल नताशा स्टेन्कोविक हिच्यासह विवाहबद्ध झाला. मात्र त्याआधी हार्दिकचं या अभिनेत्र्यांसह खास कनेक्शन असल्याची चर्चा होती. जाणून घ्या.
1 / 6
टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पंड्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुार, हार्दिक आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा स्टेनकोविक या दोघांमध्ये घटस्फोट होणार असल्याची चर्चा आहे.
2 / 6
हार्दिक पंड्या आणि नताशा स्टेनकोविक या दोघांचा 2020 साली विवाह झाला होता. मात्र आता लग्नानाच्या काही वर्षांनंतर दोघांमध्ये बिनसल्याचं म्हटलं जात आहे. हार्दिकबाबत जी भीती व्यक्त केली जात आहे, ती खरी ठरणार का? हार्दिकचं लग्नाआधी अनेक अभिनेत्रींसह नाव जोडलं गेलं होतं.
3 / 6
हार्दिकचं लग्नाआधी अभिनेत्री एली अवराम हिच्यासह नाव जोडलं गेलं होतं. या दोघांनी एकत्र एक जाहीरात केली होती. एली हार्दिकचा मोठा भाऊ क्रिकेटर कृणाल पंड्याच्या लग्नालाही उपस्थित होती. मात्र हार्दिक-एली या दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा केवळ चर्चाच ठरल्या.
4 / 6
हार्दिक आणि अभिनेत्री इशा गुप्ता या दोघांमध्ये काही तरी असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या दोघांची चर्चा फार काळ राहिली नाही. तसेच या दोघांकडून रिलेशनबाबत काही प्रतिक्रिया आली नाही.
5 / 6
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हीचंही नाव हार्दिकसह जोडलं गेलं होतं. उर्वशी सध्या टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंत याच्यामुळे चर्चेत आहे. हार्दिक आणि उर्वशी दोघांना अनेकदा पार्टी करताना पाहिलं गेलं. मात्र दोघांनी आम्ही मित्र असल्याचं म्हटलं होतं.
6 / 6
मॉडेल लीशा शर्मा आणि हार्दिक पंड्या या दोघांमध्येही काही सुरु असल्याची चर्चा होती. हे दोघे रिलेशमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र दोघेही 1 वर्षानंतर वेगळे झाले.