Rohit Sharma : रोहित शर्माची संपत्ती किती? जाणून घ्या आकडा
Rohit Sharma Net Worth : टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा मंगळवारी 30 एप्रिलला आपला 37 वा जन्मदिन साजरा करणार आहे.रोहित शर्माच्या धावा सर्वांनाच माहितीयत, पण त्याची संपत्तीबद्दल तुम्हाला माहितीय?
1 / 5
रोहित शर्माचं नेटवर्थ जवळपास 214 कोटी इतकं आहे. रोहित शर्मा वार्षिक करार, मॅच फी, आयपीएल आणि जाहिरातींच्या माध्यमातून कोटींची कमाई करतो.
2 / 5
रोहित शर्माला बीसीसीआयच्या वार्षिक करारातून 7 कोटी रुपये मिळतात. रोहितचा बीसीसीआय वार्षिक करारातील ए श्रेणीत समावेश आहे.
3 / 5
रोहितला एक कसोटी सामना खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळलात. तर 1 वनडे मॅचसाठी 6 रुपये मिळतात. तर 1 टी 20 मॅचमधून 3 लाख रुपयांची कमाई होते.
4 / 5
तसेच रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी खेळतो. मुंबई इंडियन्स फ्रँचायजी रोहितला 16 कोटी रुपये देते. तर रोहितने आतापर्यंत आयपीएलमधून 178 कोटींची कमाई केली आहे.
5 / 5
रोहित शर्माने अनेक बड्या ब्रँडसह करार केले आहेत. तसेच रोहित इतर माध्यमातून कोटी कमावतो.