भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिसरा सामना जबरदस्त झाला. भारताने विजयासाठी दिलेल्या धावा बरोबरीत सोडवल्याने सुपर ओव्हरमध्ये सामना गेला. मात्र पहिल्या सुपर ओव्हरमध्येही सामना ड्रा झाला. त्यामुळे दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये निकाल लागला.
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्ताने 6 चेंडूत 15 धावा केल्या 16 धावांचं आव्हान दिलं. पण भारतीय संघाला 15 धावा करता आल्या आणि ड्रॉ झाला. त्यामुळे दुसरी सुपर ओव्हर खेळावी लागील.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताने 2 गडी गमवून 5 चेंडूत 11 धावा केल्या आणि विजयासाठी 12 धावांचं आव्हान दिलं. पण अफगाणिस्तानचा डाव एका धावेवरच आटोपला आणि टीम इंडियाचा 10 धावांनी विजय झाला.
तिसऱ्या सामन्यातील विजयासह भारताने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत करत व्हाईट वॉश दिला. या मालिका विजयासह टीम इंडियाने पाकिस्तानचा विक्रम मोडीत काढला आहे.
पाकिस्तानने क्लिन स्विप देत आतापर्यंत 8 टी20 मालिका जिंकल्या आहेत. भारताने हा विक्रम मोडून आता इतिहास रचला आहे. भारताने 9 वेळा टी20 मालिकेत व्हाईट वॉश दिला आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 1, श्रीलंकेला 2, न्यूझीलंडला 2, वेस्ट इंडिजला 3 आणि आता अफगाणिस्तानला पराभूत केलं आहे. त्यामुळे सर्वाधिक क्लिन स्विप देण्याचा विक्रम आता भारताच्या नावावर आहे.