टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी आयसीसीकडून टीम इंडियाला गूड न्यूज, खेळाडूंचं मनोबळ आणखी वाढणार
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेची नववं पर्व वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत संयुक्तपणे होणार आहे. या स्पर्धेसाठी 20 संघ सज्ज आहेत. टीम इंडियाकडून जेतेपदाचा भरपूर आशा आहेत. असं असताना या स्पर्धेपूर्वी टीम इंडियासाठी गूड न्यूज आहे.
1 / 12
टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने टी20 रँकिंग जाहीर केली आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सहभागी असेल्या 20 संघ या क्रमवारीत आहेत. या क्रमवारीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. त्यामुळे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला स्फुरण मिळणार आहे.
2 / 12
टीम इंडियाने 264 गुणांसह टी20 संघांच्या नव्या क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. आता जेतेपद मिळवून आपलं अव्वल स्थान कायम ठेवण्याची अपेक्षा आहे.
3 / 12
ऑस्ट्रेलिया संघ या क्रमवारीत एकूण 257 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जेतेपदासाठी हा संघही प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.
4 / 12
तिसऱ्या स्थानावर गतविजेता इंग्लंड आहे. इंग्लंडचे एकूण 254 गुण आहेत.
5 / 12
वेस्ट इंडिजचा संघ 252 गुणांसह या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेत उलटफेर करण्याची ताकद वेस्ट इंडिज संघात आहे. या संघातील बऱ्याच खेळाडूंना टी20 लीगचा अनुभव आहे.
6 / 12
न्यूझीलंडचा संघ 250 गुणांसह या क्रमवारीत पाचव्या स्थानावर आहे.
7 / 12
पाकिस्तान संघाचे एकूण 244 गुण असून टी20 क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे.
8 / 12
दक्षिण आफ्रिका संघ 244 गुणांसह दनवीन क्रमवारीत सातव्या स्थानावर आहे.
9 / 12
श्रीलंकन संघाचे एकूण 232 गुण आहेत आणि टी20 संघांच्या नवीन क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.सराव सामन्यात नेदरलँडने पराभूत केल्याने वर्ल्डकपपूर्वी चिंता वाढली आहे.
10 / 12
बांगलादेश संघ 226 गुणांसह या यादीत नवव्या स्थानावर आहे.
11 / 12
अफगाणिस्तान संघ टी20 क्रमवारीत 217 गुणांसह दहाव्या स्थानावर आहे.
12 / 12
आयर्लंड (197) गुणांसह अकराव्या, झिम्बाब्वे (192) गुणांसह बाराव्या, नामिबिया (189) गुणांसह तेराव्या, स्कॉटलंड (189) गुणांसह चौदाव्या, नेदरलँड (184) गुणांसह पंधराव्या, यूएई (176) गुणांसह सोळाव्या, नेपाळ (171) गुणांसह सतराव्या, यूएसए (165) गुणांसह अठराव्या, ओमान (165) गुणांसह एकोणवीसव्या आणि पापुआ न्यू गिनी (147) गुणांसह विसाव्या स्थानावर आहे.