रोहित शर्माच्या नावावर कर्णधार म्हणून आतापर्यंतचा सर्वात वाईट विक्रम, पहिल्यांदाच असं घडलं

| Updated on: Dec 31, 2024 | 12:27 PM

टीम इंडियाने वर्षभरात 15 कसोटी सामने खेळले. रोहित शर्माने 14 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. तर एका सामन्यात जसप्रीत बुमराहने कर्णधारपदाची भूमिका बजावली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला फक्त सात सामन्यात विजय मिळवता आला आहे.

1 / 6
रोहित शर्माच्या कसोटी नेतृत्वावर सर्वच स्तरातून टीकेचे बाण सोडले जात आहेत. त्याला कारणंही तसंच आहे. कारण सततच्या पराभवामुळे भारतीय क्रीडाप्रेमी नाराज आहेत. न्यूझीलंडविरुद्ध भारतात 3-0 ने मालिका गमवणं यासारखं वाईट काहीच असू शकत नाही. टीम इंडियाने मागच्या सात सामन्यांपैकी पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

2 / 6
टीम इंडियाने सात सामन्यापैकी एका सामन्यात विजय मिळवला. पण त्या संघाचं नेतृत्व जसप्रीत बुमराहच्या हाती होतं. तर ब्रिस्बेन कसोटी सामना पावसामुळे ड्रॉ झाला. त्यामुळे हा पराभव हुकला असंच म्हणावं लागेल. रोहित शर्माने 14 सामन्यात नेतृत्व केलं, त्यापैकी 7 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे.

3 / 6
पराभवाच्या मालिकेसह कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला एका वर्षात सर्वाधिक पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. यापूर्वी सचिन तेंडुलकरच्या नावे हा विक्रम होता.

4 / 6
सचिन तेंडुलकर कर्णधार असताना 1999 मध्ये टीम इंडियाने 5 कसोटी सामना गमावले होते. तेव्हा सचिनच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित होता. एका वर्षात सर्वाधिक पराभव स्वीकारलेला टीम इंडियाचा कर्णधार होता.

5 / 6
सचिन तेंडुलकरच्या नावावर असलेला नकोसा विक्रम 25 वर्षांनी मोडला आहे. यावर्षी टीम इंडियाने एकूण 15 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 14 सामन्यात रोहित शर्मा कर्णधार होता.

6 / 6
टीम इंडियाने 14 सामन्यांपैकी फक्त 7 सामन्यात विजय मिळवला आहे. उर्वरित सात सामन्यापैकी एक सामना ड्रॉ झाला आहे.  त्यामुळे रोहित शर्माच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. जर टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीत क्वॉलिफाय झाली नाही. तर ही मालिका त्याच्या नेतृत्वाखाली शेवटची मालिका असणार आहे.