World Cup 2023 | टीम इंडिया वर्ल्ड कप 2023 मध्ये याबाबतीत अव्वल
Icc World Cup 2023 | टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये निर्णायक भूमिका बजावली आहे. बॅटिंग आणि बॉलिंगने खेळाडूंनी धमाका केला आहे. या आधारावरच टीम इंडियाने सलग 10 सामने जिंकण्याची कामगिरी केली आहे.
1 / 9
सर्वाधिक धावा| विराट कोहली वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. विराटने 10 सामन्यांमध्ये 711 धावा केल्या.
2 / 9
सर्वाधिक विकेट्स| मोहम्मद शमी याने 13 व्या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. शमीने 6 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली.
3 / 9
सर्वाधिक सिक्स| टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक सिक्स ठोकले. रोहितने आतापर्यंत 28 सिक्स लगावले आहेत.
4 / 9
सर्वोत्तम बॉलिंग | सर्वोत्तम बॉलिंगबाबतही मोहम्मद शमीच नंबर 1 आहे. शमीने न्यूझीलंड विरुद्ध सेमी फायनलमध्ये 57 धावांच्या मोबदल्यात 7 विकेट्स घेतल्या.
5 / 9
बेस्ट बॅटिंग एव्हरेज| बेस्ट बॅटिंग एव्हरेजबाबत विराट कोहली नंबर 1 आहे.विराटने वर्ल्ड कपमध्ये 101.57 च्या सरासरीने धावा केल्या.
6 / 9
सर्वोत्तम इकॉनॉमी रेट| जसप्रीत बुमराह याने बेस्ट इकॉनॉमीने बॉलिंग केली. बुमराहने वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक ओव्हरमध्ये सरासरी 3.98 या हिशोबाने धावा दिल्या.
7 / 9
सर्वाधिक अर्धशतकं| विराट कोहली यानेच वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक अर्धशतकं केली आहेत. विराटने 10 डावांमध्ये 8 अर्धशतक केली.
8 / 9
सर्वोत्तम बॉलिंग एव्हरेज| मोहम्मद शमीने बेस्ट बॉलिंग एव्हरेजसह विकेट्स घेतल्या आहे. शमीचा बॉलिंग एव्हरेज 9.13 इतका आहे.
9 / 9
सर्वोत्तम बॉलिंग स्ट्राईक रेट | सर्वोत्तम बॉलिंग स्ट्राईक रेटमध्येही मोहम्मद शमी सरस आहे. शमीने वर्ल्ड कपमध्ये 11 बॉलनंतर विकेट घेतली आहे.