Retirement | आशिया कप स्पर्धेच्या तोंडावर टीम इंडियाच्या स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय

| Updated on: Aug 03, 2023 | 5:41 PM

Cricketer Retirement | टीम इंडियाच्या स्टार खेळाडूने इंस्टाग्राम पोस्ट करत निवृत्ती घेत असल्याची माहिती दिलीय.

1 / 5
मनोज तिवारी याने क्रिकेटला रामराम ठोकलाय. टीम इंडिया आणि बंगालसाठी खेळणाऱ्या मनोज तिवारी याने गुरुवारी इंस्टा पोस्ट करुन निवृत्तीबाबत माहिती दिली.

2 / 5
मनोज तिवारी याने निवृत्ती जाहीर करताना कोच मानबेंद्र घोष, आई-वडील आणि पत्नी सुष्मिता यांचे आभार मानले. मी या सर्वांमुळेच इतकी वर्ष क्रिकेट खेळू शकलो, असं मनोजने म्हटलंय.

3 / 5
मनोजने क्रिकेट कारकीर्दीत 18 हजार 925 धावा केल्या. मनोजने या दरम्यान एकूण 35 शतकं ठोकलीत. मनोजने मिडल ऑर्डरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली.

4 / 5
दुर्देवी बाब अशी की प्रतिभा असूनही मनोजला टीम इंडियात सातत्याने संधी मिळाली नाही. मनोजने टीम इंडियासाठी 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 287 धावा केल्या. तसेच मनोज टी 20 मॅचही खेळला.

5 / 5
मनोजने बंगाल क्रिकेट बोर्डसाठी फार योगदान दिलंय. बंगालकडून रणजी ट्रॉफीत खेळताना मनोजने अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केलं. मनोज तिवारी सध्या बंगाल सरकारमध्ये क्रीडा मंत्री आहे.