IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या दोन वनडेसाठी टीम इंडियाचा मास्टर प्लान, नेमकं काय केलं ते वाचा
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका 22 सप्टेंबरपासून सुरु होणार असून यासाठी टीमची घोषणा करण्यात आली आहे. पण खास रणनितीनुसार ही टीमची घोषणा करण्यात आली आहे.
1 / 6
आशिया कप 2023 जेतेपदावर नाव कोरल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाली आहे. यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पहिल्या दोन वनडेसाठी दिग्गज खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. त्या मागे खास रणनिती असल्याचं बोललं जात आहे.
2 / 6
पहिल्या दोन वनडे सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव यांना आराम देण्यात आला आहे. तिसऱ्या वनडे सामन्यात हे तिनही खेळाडू खेळणार आहेत. जसप्रीत बुमराह आणि सिराज खेळत असताना कुलदीप यादवला आराम का? असा प्रश्न विचारला जात आहे.
3 / 6
वर्ल्डकप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवत ही रणनिती आखली गेल्याचं बोललं आहे. आशिया कप स्पर्धेत कुलदीपच्या गोलंदाजीसमोर पाकिस्तान आणि श्रीलंकेचे खेळाडू हतबल दिसून आले होते. पाकिस्तान विरुद्ध 5 आणि श्रीलंकेविरुद्ध 4 गडी बाद केले होते.
4 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धा भारतात आहे. श्रीलंका आणि भारताच्या परिस्थितीत फारसा फरक नाही. त्यामुळे कुलदीप यादव प्लेइंग इलेव्हनमध्ये एक्स फॅक्टर असेल. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर मोठं आव्हान असणार आहे.
5 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत कुलदीप यादवकडून मोठी अपेक्षा आहे. चेन्नईचं एमए चिदंबरम स्टेडियम फिरकीपटूंना मदत करणारा आहे. त्यामुळे कुलदीपचा अभ्यास आधीच केला गेला तर वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया फायदा होईल. त्यामुळे रणनितीनुसार कुलदीपला पहिल्या दोन वनडे आराम दिल्याचं बोललं जात आहे.
6 / 6
तिसऱ्या वनडेसाठी टीम इंडिया रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज. राखीव खेळाडू : वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन