IND vs IRE: आयर्लंड विरुद्धच्या सामन्याआधी रोहितसेनेचा जोरदार सराव, कोण ठरणार टीम इंडियाच्या विजयाचा हिरो?
India vs Ireland T20 World Cup 2024: टीम इंडिया आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात आयर्लंड विरुद्ध करणार आहे. टीम इंडियाने या सामन्याआधी जोरदार सराव केला.
1 / 10
टीम इंडिया आणि आयर्लंड दोन्ही संघ आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील मोहिमेची सुरुवात एकमेकांविरुद्धच्या सामन्याने करणार आहेत. या सामन्यासाठी टीम इंडियाने जोरदार सराव केला आहे. बीसीसीआयने सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 10
टीम इंडिया रोहित शर्मा याच्या नेतृत्वात या वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार आहे. रोहित शर्माकडून टीम इंडियाला जोरदार सुरुवातीची अपेक्षा असणार आहे.
3 / 10
हार्दिक पंड्या याने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली होती. हार्दिककडून आयर्लंड विरुद्धही अशीच कामगिरी अपेक्षित आहे.
4 / 10
यशस्वी जयस्वालला सराव सामन्यात बॅटिंगची संधी देण्यात आली नाही. यशस्वीऐवजी संजू सॅमसन ओपनिंगला आला होता. आता जयस्वालला आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात संधी मिळणार की रोहितला नवा पार्टनर मिळणार, याकडे लक्ष असणार आहे.
5 / 10
विराट कोहली बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात खेळला नव्हता. तो आता थेट आयर्लंड विरुद्धच्या सामन्यातूनच मैदानात उतरणार आहे. आता विराट कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचंच लक्ष असेल.
6 / 10
टीम इंडियाचा 'मिस्टर 360' अर्थात सूर्यकुमार यादव आयर्लंड विरुद्ध खेळण्यासाठी सज्ज आहे. सूर्या नेट प्रॅक्टिस दरम्यान आयर्लंड विरुद्ध खेळण्यासाठी उत्सूक असल्याचा पाहायला मिळाला.
7 / 10
रवींद्र जडेजा याच्याकडे बॅटिंग-बॉलिंग अशी दुहेरी जबाबदारी असणार आहे. तसेच जडेजाकडून फिल्डिंगमध्येही भरीव कामिगिरी अपेक्षित आहे.
8 / 10
युझवेंद्र चहल जडेजाला साथ देणार आहे. चहलकडून भारतीयांना खूप आशा आहेत. चहलने टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात फिरकी बॉलिंगचा सराव केला. तसेच कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनीही नेटमध्ये घाम गाळला.
9 / 10
तर जसप्रीत बुमराह याच्या खांद्यावर टीम इंडियाच्या बॉलिंगची जबाबदारी असणार आहे. तर मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंह यांच्याकडून भेदक गोलंदाजीची अपेक्षा असणार आहे.
10 / 10
तसेच विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन की ऋषभ पंत या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार, याकडे साऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. आता दोघांपैकी कोण बाजी मारतं, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.