Team India | टीम इंडियाचा स्टार खेळाडू कमबॅकसाठी सज्ज, फोटो व्हायरल
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन हा दुखापतीमुळे काही महिन्यांपासून बाहेर आहे. दुखापतीमुळे या खेळाडूला आयपीएल आणि wtc final 2023 महाअंतिम सामन्याला मुकावं लागलं.
1 / 6
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याने सोशल मीडियावर फोटो शेअर केलेत. या फोटोत केएल फिजियोसोबत दिसत आहे.
2 / 6
केएल दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. केएल आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. केएलला आयपीएल 16 व्या मोसमात दुखापत झाली. केएलला दुखापतीमुळे या आयपीएल 16 व्या मोसमाला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल महामुकाबल्याला मुकावं लागलं होतं. मात्र आता केएल टीम इंडियात कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. केएल आशिया कप स्पर्धेआधी फिट होऊ शकतो, असं म्हटलं जातंय.
3 / 6
केएलने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत फिजिओथेरिपस्ट दिसोय. केएल सध्या बंगळुरुतील एनसीएत तयारी करतोय.
4 / 6
केएलच्या फोटोवर शिखर धवन याने कमेंट केलीय. शिखरने कमेंटद्वारे केएलला प्रोत्साहन देण्याचं काम केलंय. केएलने टीम इंडियासाठी मार्च 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरचा सामना खेळला होता.
5 / 6
केएलने नुकत्याच शेअर केलेल्या व्हीडिओत तो वर्कआऊट करताना दिसतोय. ऋषभ पंतने केएलच्या या व्हीडिवर 'वेलकम ब्रदर' अशी कमेंट केली होती.
6 / 6
केएलने 47 कसोटी, 54 वनडे आणि 72 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. केएलने यात अनुक्रमे 2 हजार 642, 1 हजार 986 आणि 2 हजार 265 धावा केल्या आहेत. केएल आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.