IND vs WI: पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत टीम इंडियाचे हे खेळाडू रचणार विक्रम, कोणते ते वाचा

| Updated on: Aug 03, 2023 | 4:43 PM

IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध पाच सामन्यातील पहिला टी 20 सामना खेळताच टीम इंडिया आणखी एक मैलाचा दगड पार करणार आहे. टीम इंडिया 200 सामने खेळणारा संघ ठरणार आहे. तसेच काही खेळाडू विक्रमाच्या उंबरठ्यावर आहेत. कोणते ते जाणून घ्या

1 / 8
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला टी20 सामना खेळताच टीम इंडियाच्या नावावर 200 वा आंतरराष्ट्रीय होणार आहे.

2 / 8
टीमचा कर्णधार हार्दिक पांड्या याने या मालिकेत  दोन गडी बाद करताच 150 विकेट्सचा टप्पा पूर्ण करणार आहे. तसेच चार हजारांहून अधिक टी-20 धावा आणि 150 हून अधिक बळी घेणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

3 / 8
संजू सॅमसनला टी20 क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 21 धावांची गरज आहे. यासह हा टप्पा गाठणारा संजू हा 12 वा भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.

4 / 8
सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 325 धावांची आवश्यकता आहे. या सामन्यात त्याने आक्रमक खेळी केल्यास हा विक्रम रचणार आहे.

5 / 8
युजुवेंद्र चहलला आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 बळींचा विक्रम गाठण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. असं झाल्यास ही कामगिरी करणारा चहल हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरेल.

6 / 8
अर्शदीप सिंगला टी20 क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 9 विकेट्सची गरज आहे. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या आणि झुलन गोस्वामी यांच्यानंतर ही कामगिरी करणारा पाचवा वेगवान गोलंदाज ठरेल.

7 / 8
कुलदीप यादवला टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी आणखी 4 विकेट्सची गरज आहे. आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 50 बळी घेणारा खेळाडू ठरण्याची कुलदीपकडे संधी आहे.

8 / 8
अक्षर पटेलला टी20 क्रिकेटमध्ये 2500 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 80 धावांची गरज आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2,500 धावा आणि 150 किंवा त्याहून अधिक बळी घेणारा रवींद्र जडेजानंतरचा दुसरा अष्टपैलू ठरेल.