Rohit Sharma Virat Kohli: रोहित शर्मा-विराट कोहलीची एकूण संपत्ती किती?
Virat Kohli And Rohit Sharma Net Worth: रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर दोघांनी टी20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
1 / 5
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन टी 20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. या दोघांची संपत्ती किती आहे हे आपण या निमित्ताने जाणून घेऊयात.
2 / 5
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्माचं नेटवर्थ 214 कोटी आहे. रोहितकडे बीसीसीआयचं ए प्लस वार्षिक करार आहे. रोहितला प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15, वनडे आणि टी 20 क्रिकेटमधील प्रत्येकी 1 सामन्यासाठी 6 आणि 3 लाख रुपये मिळतात. तसेच रोहित आयपीएल आणि जाहिरातींद्वारे कमाई करतो.
3 / 5
रोहितच्या ताफ्यात महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. तसेच आलीशान घरही आहे. रोहितच्या मुंबईतील घराची रक्कम 30 कोटींच्या घरात आहे.
4 / 5
विराट कोहलीची मीडिया रिपोर्ट्सनुसार एकूण संपत्ती 1 हजार 50 कोटी इतकी आहे. विराटलाही बीसीसीआयकडून ए प्लस वार्षिक करारानुसार वेतन मिळतं. तसेच विराटला आयपीएलमधून 16 कोटींची कमाई होते. विराट जाहिरातीतूनही कमावतो.
5 / 5
विराट मुंबई त्याची पत्नी अनुष्का शर्मा हीच्यासह बंगल्यात राहतो. त्या बंगल्याची किंमत 34 कोटी इतकी आहे. विराटची गुरुग्राम येथे संपत्ती आहे, त्याची किंमत जवळपास 100 कोटी इतकी आहे.