Rohit-Virat: रोहित शर्मा की विरोट कोहली? दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण? जाणून घ्या
Team India Rohit Sharma And Virat Kohli: टीम इंडियाचे आजी माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आतापर्यंत गेल्या अनेक वर्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलीय. मात्र दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? जाणून घ्या.
1 / 6
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे आजी आणि माजी कर्णधार आहेत. या दोघांनी टीम इंडियाला आतापर्यंत अनेक सामन्यात विजय मिळवून दिला आहे.
2 / 6
विराट आणि रोहित या दोघांनी आपल्या विस्फोटक आणि निर्भिड बॅटिंगच्या जोरावर क्रिकेट विश्वात आपला ठसा उमटवला आहे.रोहित आणि विराट या दोघांचही सर्वोत्तम कर्णधार आणि खेळाडूंमध्ये कायम नाव घेतलं जातं.
3 / 6
विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी कर्णधार आणि फलंदाज म्हणून अप्रतिम कामगिरी केली आहे.दोघांनीही आतापर्यंत विविध माध्यमातून खोऱ्याने पैसा कमावला आहे.
4 / 6
मात्र विराट आणि रोहित या दोघांपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे? तुम्हाला माहित आहे का? आपण या दोन्ही खेळाडूंपैकी सर्वात श्रीमंत कोण आहे, हे जाणून घेऊयात.
5 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहलीचं आतापर्यंत नेटवर्थ हे 127 मिलियन डॉलर इतकं आहे. अर्थात विराटचं नेटवर्थ हे भारतीय रुपयात 1 हजार 66 कोटी रुपये इतकं आहे.
6 / 6
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा याचं नेटवर्थ हे 214 कोटी इतकं आहे. अर्थात विराट कोहली हा पैशांबाबत रोहितपेक्षा सरस आहे.