रोहित शर्माचे हे पाच विक्रम मोडण्यासाठी घ्यावा लागेल दुसरा जन्म! जाणून घ्या काय ते

| Updated on: Aug 21, 2024 | 8:40 PM

रोहित शर्मा हे क्रिकेट विश्वातील मोठं नाव..अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत. रोहित शर्माने आजवर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. पण त्याच्या नावावर असलेले पाच विक्रम मोडीत काढणं खूपच कठीण होईल. चला जाणून घेऊयात त्याबाबत

1 / 6
वनडे वर्ल्डकप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पराभवाची चव चाखल्यानंतर टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी20 वर्ल्डकप चषकावर नाव कोरलं. त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होतं. असं असताना रोहित शर्माच्या नावावर असलेल्या पाच विक्रमांची चर्चा रंगली आहे. हे पाच विक्रम कधीच मोडीत निघणार नाहीत.

2 / 6
वनडे क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्माच्या नावावर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. कित्येक वर्षे सईद अनवर 196 धावांचा विक्रम घेऊन चालला होता. पण सचिन तेंडुलकरने 200 धावा करत सर्वच धुळीस मिळवलं. पण त्याच्या एक पाऊल पुढे जात रोहित शर्माने 264 धावा केल्या. वनडे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे.

3 / 6
वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माने एकदा नव्हे तर तीनदा द्विशतकी खेळी केली आहे. रोहित शर्मा अशी कामगिरी करणारा एकमेव फलंदाज आहे. रोहित शर्माने 208, 209 आणि 264 धावांची खेळी केली आहे.

4 / 6
रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने तिन्ही फॉर्मेटमध्ये  620 षटकार मारले आहेत. आतापर्यंत अशी कामगिरी कोणत्याही फलंदाजाला करता आलेली नाही.

5 / 6
रोहित शर्माने एकाच वर्ल्डकपमध्ये पाच शतकं ठोकली आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये त्याने ही कामगिरी केली होती. त्याच्या या विक्रमाची बरोबरी करणं कठीण आहे.

6 / 6
रोहित शर्मा हा टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज आहे. त्याने या फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. पण त्याने 205 षटकार मारले आहेत. त्यामुळे त्याच्या आसपास पोहोचणं खूपच कठीण आहे.