Asia Cup 2023 | या त्रिकुटावर टीम इंडियाची जबाबदारी, आशिया कप जिंकवणार?
Asia Cup 2023 Indian Cricket Team | टीम इंडिया आशिया कपमध्ये 2 सप्टेंबरला पहिला सामना खेळणार आहे. सामन्याच्या 2 दिवसांआधी टीम इंडिया श्रीलंकेत दाखल झाली आहे.
1 / 5
टीम इंडिया आशिया कप 2023 मधील आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध 2 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियाचे सर्व सामने हे श्रीलंकेत होणार आहेत.
2 / 5
टीम इंडिया आशिया कपसाठी श्रीलंकेत दाखल झाली आहे. या संपूर्ण आशिया कपमध्ये तिघांवर टीम इंडियाची मोठी जबाबदारी असणार आहे.
3 / 5
रोहित शर्मा याच्याकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची सूत्रं आहेत. तसेच रोहित ओपनिंग करणार आहे. त्यामुळे रोहितला कॅप्टन्सीसह टीमला चांगली सुरुवात मिळवून देण्याची जबाबदारी असेल.
4 / 5
विराट कोहली याने टीम इंडियासाठी आतापर्यंत संकटमोचकाची भूमिका बजावली आहे. विराट अनुभवी बॅट्समन आहे. विराट फिल्डिंगही जबरदस्त करतो. त्यामुळे विराटकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
5 / 5
हार्दिक पंड्या याच्याकडे टीम इंडियाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. तसेच हार्दिकचा टीममध्ये ऑलराउंडर म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हार्दिकवर बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगसह उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.