टीम इंडियाचं टी20 वर्ल्डकपनंतर असं असेल वेळापत्रक, वाचा कधी कोणता सामना ते
भारत इंग्लंड कसोटी मालिका संपली असून आता आयपीएलचे वेध लागले आहेत. त्यानंतर टीम इंडिया थेट टी20 वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसणार आहे. आता टीम इंडियाचं वर्षभराचं वेळापत्रक समोर आलं आहे. कधी कोणता सामना खेळणार ते जाणून घ्या
1 / 8
आयपीएलचं 17 वं पर्व सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवस शिल्लक आहे. यासाठी टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू सज्ज आहेत. पुढील दोन महिने आयपीएलचा थरार अनुभवायला मिळणार आहे. असं असताना टीम इंडियाचं पुढचं शेड्युल एकदम बिझी असणार आहे.
2 / 8
22 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. साधरणत: 21 मे रोजी अंतिम फेरीचा सामना असेल. ठरल्याप्रमाणे एकूण 72 सामने होतील आणि साखळी फेरीत प्रत्येक संघाच्या वाटेला 14 सामने येतील.
3 / 8
आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्यातच टी20 वर्ल्डकपचा थरार अनुभवता येणार आहे. वर्ल्डकपचं आयोजन वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे करण्यात आलं आहे. 1 जून ते 29 जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला असणार आहे.
4 / 8
टी20 विश्वचषक संपल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे विरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. ही मालिका 6 जुलैपासून सुरू होईल आणि 14 जुलैला संपेल.
5 / 8
टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 6 सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुलै-ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहेत.
6 / 8
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताला आणखी 10 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 2 सामन्याची कसोटी मालिका बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. सप्टेंबर महिन्यात ही मालिका पार पडणार आहे.
7 / 8
ऑक्टोबरमध्ये 3 सामन्यांची भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेतून भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीचं गणित स्पष्ट होणार आहे.
8 / 8
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणार आहे, या मालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया एकूण 5 कसोटी सामने खेळणार आहेत. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात जाणार असून तिथल्या मातीत विजय मिळवणं कठीण आहे.