टीम इंडियाच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद, इतके षटकार मारत गाठलं पहिलं स्थान

| Updated on: Dec 22, 2023 | 6:02 PM

टीम इंडियाने 2023 मध्ये एकूण 35 वनडे सामने खेळले आहेत. कॅलेंडर वर्षात टीम इंडियाच्या फलंदाजांनी सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत भारत पहिल्या, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या आणि वेस्ट इंडिज तिसऱ्या क्रमांकावर आहे.

1 / 6
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 78 धावांनी पराभव करत एकदिवसीय मालिका 2-1 अशी जिंकली.

2 / 6
तिसऱ्या सामन्यात भारताने एकूण 8 षटकार ठोकले. या 8 षटकारांच्या जोरावर भारताने इतिहास रचला आणि एका कॅलेंडर वर्षात 250 षटकार मारणारा जगातील पहिला संघ बनला आहे.

3 / 6
आतापर्यंत कोणत्याही संघाला एका वर्षात वनडे फॉरमॅटमध्ये इतके षटकार मारता आले नाहीत. एकीकडे केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय मालिका जिंकली, तर दुसरीकडे वनडेमध्ये विक्रम करण्यात यश मिळवले.

4 / 6
दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर असून या संघाने 2023 मध्येच हा पराक्रम केला आहे. या वर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकूण 225 षटकार दक्षिण अफ्रिकेन संघाने ठोकले.

5 / 6
या यादीत वेस्ट इंडिजचा संघ 209 षटकारांसह तिसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 2019 मध्ये एकदिवसीय सामन्यांमध्ये हे षटकार मारले होते.

6 / 6
भारतीय संघाने 2023 मध्ये एकूण 35 सामने खेळले. टीम इंडियाने 27 सामने जिंकले तर 7 सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तर एक सामना निकालाविना संपला.