1..2..3..4..10 ! भारताने पाचव्या टी20 सामन्यात नोंदवले इतके सारे विक्रम, एका क्लिकवर सर्वकाही

| Updated on: Feb 02, 2025 | 10:40 PM

इंग्लंड विरुद्धचा पाचवा टी20 सामना भारतासाठी ऐतिहासिक ठरला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा उडवला. तसेच या सामन्यात विक्रमांचा पाऊस पाडला. पहिल्या चेंडूपासून विक्रमाची नोंद होण्यास सुरुवात झाली होती. चला जाणून घेऊयात काय विक्रम केले ते..

1 / 10
इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी20 सामन्याच्या पहिल्या चेंडूवर संजू सॅमसनने षटकार मारला. अशी कामगिरी करणारा भारताचा तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी 2021 मध्ये रोहित शर्माने आदिल राशीदला, तर यशस्वी जयस्वालने सिकंदर रझाला 2024 मध्ये षटकार मारला होता.

2 / 10
अभिषेक शर्माने शतकी खेळी केली असली तरी त्याने 17 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. हा देखील एक विक्रम ठरला आहे. भारताकडून 12 चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर आहे. तर सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने 18 चेंडूत ही कामगिरी केली आहे.

3 / 10
टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला आहे. यापूर्वी भारताने स्कॉटलंडविरुद्ध पॉवर प्लेमध्ये 82 धावा केल्या होत्या. आता हा विक्रम मोडीत काढत भारताने इंग्लंडविरुद्ध 1 गडी गमवून 95 धावा केल्या.

4 / 10
अभिषेक शर्मा सर्वात वेगाने शतक ठोकणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी डेविड मिलर आणि रोहित शर्मा यांनी 35 चेंडूत शतकी खेळी केली आहे. तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत शतक पूर्ण केलं.

5 / 10
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा मान अभिषेक शर्माला मिळाला आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 13 षटकार ठोकले. यापू्र्वी हा विक्रम रोहित शर्मा, संजू सॅमसन आणि तिलक वर्माच्या नावावर होता. त्यांनी प्रत्येकी 10 षटकार मारले आहेत.

6 / 10
अभिषेक शर्मा एकाच सामन्यात शतक आणि विकेट घेणारा पहिला भारतीय ठरला आहे. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आली नव्हता. त्यामुळे हा विक्रम नोंदवणारा अभिषेक शर्मा हा पहिला फलंदाज ठरला आहे.

7 / 10
अभिषेक शर्मा टी20 क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम शुबमन गिलच्या नावावर होता. त्याने नाबाद 126 धावांची खेळी केली होती. आता अभिषेक शर्माने 135 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.

8 / 10
अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यात चांगली भागीदारी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंनी 36 चेंडूत 100 धावा केल्या आहेत.

9 / 10
भारताने टी20 क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध चौथा मोठा स्कोअर केला. बांगलादेशविरुदध 297, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 283. श्रीलंकेविरुद्ध 260 आणि आता इंग्लंडविरुद्ध 247 धावा केल्या.

10 / 10
भारताने मोठ्या फरकाने पराभूत केलेला इंग्लंड हा दुसरा संघ ठरला आहे. भारताने इंग्लंडला 150 धावांनी पराभूत केलं. 2023 मध्ये भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी धुव्वा उडवला आहे.  (सर्व फोटो- बीसीसीआय)