Icc World Cup 2023 मध्ये पहिल्यांदाच टीम इंडियासाठी हे 6 जण खेळणार, 3 मुंबईकर खेळाडूंचा समावेश
Icc World Cup 2023 | टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात 8 ऑक्टोबरपासून करणार आहे. टीम इंडिया वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. टीम इंडियाच्या गोटात 6 असे खेळाडू आहेत जे पहिल्यांदाच वर्ल्ड कप खेळणार आहेत. ते कोण आहेत आपण जाणून घेऊयात.
1 / 6
टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याने आतापर्यंत 2023 या वर्षात अफलातून कामगिरी केली आहे. यंदा वर्ल्ड कप भारतात होत असल्याने गिल आणखी आक्रमक आणि धमाकेदार कामगिरी करु शकतो.
2 / 6
ईशान किशन बॅटिंगसह विकेटकीपिंगची जबाबदारी सांभाळतो. ईशानने गेल्या काही वर्षांमध्ये उल्लेखनीय कामिगिरी केलीय. ईशान ओपनिंगपासून वाटेल त्या ठिकाणी बॅटिंग करु शकतो. ईशानमध्ये टीम इंडियाला एकहाती सामना जिंकून देण्याची क्षमता आहे.
3 / 6
टीम इंडियाचा मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादव. सूर्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या 2 सामन्यात अर्धशतकी खेळी करुन आपण सज्ज असल्याचं जाहीर केलंय. सूर्याकडून वर्ल्ड कपमध्ये तडाखेदार बॅटिंग पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
4 / 6
श्रेयस अय्यर याने दुखापतीतून जोरदार कमबॅक करत ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक ठोकलं. श्रेयसने या शतकासह वर्ल्ड कप प्लेईंग ईलेव्हनसाठी आपला दावा मजबूत केलाय.
5 / 6
मोहम्मद सिराज याने आशिया कप फायलमध्ये 6 विकेट्स घेत श्रीलंकेला गुंडाळलं होतं. सिराज टीम इंडियासाठी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने विकेट्स घेतोय. सिराजकडून तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
6 / 6
'द लॉर्ड' आणि 'पालघर एक्सप्रेस' या नावाने शार्दुल ठाकुर ओळखला जातो. शार्दुलने टीम इंडियाला निर्णायक वेळी विकेट्स मिळवून दिल्या आहेत. त्याच्याच बॅटिंगची क्षमता आहे. शार्दुलला गेल्या काही महिन्यात बॅटिंगने धमाका करता आलेला नाही. मात्र शार्दुल वर्ल्ड कपमध्ये बॅटिंगने धमाका करेल, अशी आशा आहे.