Team India | वर्ल्ड कप सोडाच, एशियन गेम्समध्येही संधी नाही, टीम इंडियाचे 3 दुर्देवी खेळाडू
indian cricket team | टीम इंडियाची सिनिअर टीम ही वर्ल्ड कपसाठी पूर्वतयारी करतेय. तर बी टीम ही चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्स 2023 साठी सज्ज आहे. मात्र टीम इंडियाच्या 3 अनुभवी खेळाडूंना दोन्ही स्पर्धांसाठी संधी देण्यात आली नाही.
1 / 7
आयसीसी वनडे वर्ल्ड कपला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. बीसीसीआयने वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणाही केलीय. टीम इंडिया पहिला सामना हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.त्याआधी टीम इंडियाचे असे 3 दुर्देवी खेळाडू आहेत, ज्यांना चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्समध्येही संधी देण्यात आली नाही.
2 / 7
टीम इंडियाचा 'गब्बर' शिखर धवन याची वर्ल्ड कपसाठी निवड करण्यात आली नाही.धवनला एशियन गेम्समध्ये कर्णधार करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात होतं. कॅप्टन्सी सोडा त्याला टीममध्येही घेतलं नाही.
3 / 7
धवनने 167 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 शतकांच्या मदतीने 6 हजार 793 धावा केल्या आहेत. तसेच धवनने 68 टी 20 आणि 34 कसोटी सामन्यांमध्येही टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय.
4 / 7
युझवेंद्र चहल याला ना वर्ल्ड कप टीमध्ये संधी दिलीय ना एशियन गेम्स 2023 मध्ये. वर्ल्ड कप टीममध्ये कुलदीप यादव याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे चहलला संधी मिळाली नाही.
5 / 7
चहलने 72 एकदिवसीय आणि 80 टी 20 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. चहलने वनडेत 12 आणि टी 20 मध्ये 96 विकेट्स घेतल्या आहेत.
6 / 7
भुवनेश्वर कुमार याने आपल्या स्विंगच्या जोरावर भल्या भल्यांच्या दांड्या गुल केल्या आहेत. मात्र भुवनेश्वरचा गेल्या काही मालिकांसाठीही विचार करण्यात आला नाही.
7 / 7
भुवनेश्वर कुमार 87 टी 20, 121 एकदिवसीय आणि 21 कसोटी सामने खेळला आहे. भुवनेश्वरने यामध्ये अनुक्रमे 90, 141 आणि 63 विकेट्स घेतल्या आहेत.