IND vs AFG : दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सीरिजनंतर भारताच्या टी 20 संघात इतका बदल
बीसीसीआय निवड समितीने 2 सीरिजमध्ये पूर्णपणे टीम बदलून टाकली. जे दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये टीम इंडियाचे कर्णधार-उपकर्णधार होते, त्यांचा समावेश अफगाणिस्तान विरुद्ध करण्यात आलेला नाही. जाणून घ्या.
1 / 5
टीम इंडिया-अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या टी 20 सीरिजला सुरुवात होणार आहे. पहिला सामना हा मोहालीत पार पडेल. त्यानंतर 14 जानेवारीला दुसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये होणार आहे. तर तिसरा आणि अंतिम सामना हा बंगळुरुत 17 जानेवारी रोजी होणार आहे. या सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत अफगाणिस्तान विरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात अनेक बदल करण्यात आले आहेत.
2 / 5
ईशान किशन दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी 20 मालिकेत होता. मात्र आता अफगाणिस्तान विरुद्ध विकेटकीपर बॅट्समनला संधी मिळाली नाही.
3 / 5
श्रेयस अय्यर याचाही अफगाणिस्तान विरुद्धच्या सीरिजमध्ये टीम इंडियात समावेश नाही. श्रेयस ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरिजमध्ये उपकर्णधार होता.
4 / 5
अय्यर व्यतिरिक्त रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे देखील टीममध्ये नाहीत. या दोघांना इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी विश्रांती मिळावी म्हणून संधी न दिल्याचं म्हटलं जात आहे.
5 / 5
सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिके विरुद्ध कर्णधार होता. मात्र सूर्याला दुखापत झाली आहे. तसेच त्याला हर्निया झालाय. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला दुखापत आहे. तसेच हार्दिक पंड्या अजूनही फिट नाही. (All Photo : AFP)