ODI World Cup 2023 आधी या 2 खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन दुप्पट
Indian CriCket Team Icc World Cup 2023 | यंदा भारतात वर्ल्ड कप होत असल्याने टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाच्या दोघांमुळे टेन्शन वाढलंय. कोण आहेत ते दोघे? जाणून घ्या.
1 / 5
आयसीसी वनडे वर्ल्ड कपला आता मोजून 100 तासांपेक्षा कमी वेळ बाकी आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
2 / 5
टीम इंडियाने वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलियावर 2-1 असा विजय मिळवला. मात्र 2 खेळाडूंची कामगिरी हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे.
3 / 5
मुंबईकर सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकुर या दोघांच्या कामगिरीमुळे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया चिंतेत आहे.
4 / 5
शार्दुल ठाकुर याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत 14 ओव्हर बॉलिंग केली. शार्दुलने 14 ओव्हरमध्ये एकही विकेट न घेता 113 धावा लुटवल्या. शार्दुलला टीममध्ये ऑलराउंडर म्हणून स्थान देण्यात आलंय. मात्र त्याला दोन्ही आघाड्यांवर हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.
5 / 5
सूर्यकुमार यादव याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या 2 सामन्यांमध्ये धमाकेदार अर्धशतकी खेळी केली. मात्र तिसऱ्या सामन्यात त्याला हीच कामगिरी कायम ठेवता आली नाही. वर्ल्ड कपच्या तोंडावर सूर्या निर्णायक सामन्यात अपयशी ठरणं टीम इंडियासाठी धोक्याची घंटा आहे.