टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाची तिसऱ्यांदा धडक, असा राहिला प्रवास
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. 2022 वर्ल्डकप स्पर्धेचा सूडही घेतला आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र इंग्लंडचा डाव भारतीय फिरकीपुढे अडखळला. आता टीम इंडियाचा सामना अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. आतापर्यंतचा टीम इंडियाचा प्रवास कसा राहिला ते जाणून घ्या
1 / 8
भारत विरुद्ध इंग्लंड या उपांत्य फेरीच्या सामन्याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून होतं. 2022 वर्ल्डकप स्पर्धेतील जखम ताजी झाली होती. पण टीम इंडियाने करून दाखवलं. इंग्लंडसमोर विजयासाठी 171 धावांचं आव्हान दिलं. इंग्लंडला या धावा करता आल्या नाहीत.
2 / 8
साखळी फेरीत भारताचा पहिला सामना आयर्लंडशी झाला. 5 जूनला झालेल्या या सामन्यात भारताने आयर्लंडला 96 धावांवरच रोखलं. तसेच आयर्लंडने दिलेलं आव्हान 12.2 षटकात पूर्ण केलं.
3 / 8
9 जूनला भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान होतं. या सामन्यात भारताचा डाव 19 षटकं खेळत 119 धावांवरच आटोपला. तसेच 120 धावांचं सोपं आव्हान पाकिस्तानसमोर होतं. पण गोलंदाजांनी पाकिस्तानला 20 षटकात 113 धावांवर रोखलं आणि 6 धावांनी विजय मिळवला.
4 / 8
साखळी फेरीतील तिसऱ्या सामन्यात अमेरिका समोर होती. अमेरिकेने पाकिस्तानला पराभूत केल्याने हे आव्हान वाटतं तितकं सोपं नव्हतं. अमेरिकेला भारातने 110 धावांवर रोखलं. तसेच हे आव्हान 7 विकेट आणि 10 चेंडू राखून पूर्ण केलं.
5 / 8
साखळी फेरीतील चौथ्या सामन्यावर पावसाचं सावट पडलं. यामुळे हा सामना न खेळताच रद्द करावा लागला. मात्र साखळी फेरीतील तीन सामने जिंकून भारताने आधीच सुपर 8 फेरीत स्थान मिळवलं होतं.
6 / 8
सुपर 8 फेरीत पहिलाच सामना अफगाणिस्तानशी झाला. या सामन्यात भारताने 20 षटकात 8 गडी गमवून 181 धावा केल्या आणि विजयासाठी 182 धावांचं आव्हान दिलं. मात्र अफगाणिस्तानचा संघ 20 षटकात सर्व गडी बाद 134 धावा करू शकला. भारताने 47 धावांनी विजय मिळवला.
7 / 8
भारत विरुद्ध बांग्लादेश हा सुपर 8 फेरीतील दुसरा सामना झाला. या सामन्यात भारताने बांगलादेशला 50 धावांनी पराभूत केलं. विजयासाठी 196 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र बांग्लादेश संघ 146 धावा करू शकला.
8 / 8
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यावर उपांत्य फेरीची मदार होती. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने साजेशी कामगिरी केली आणि विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं. ऑस्ट्रेलिया 20 षटकात 181 धावा करू शकली आणि भारताने 24 धावांनी विजय मिळवला.