Tilak Varma चा शतकासह धमाका, सेंच्युरियनमध्ये रेकॉर्ड्सची रांग

| Updated on: Nov 14, 2024 | 11:14 AM

Tilak Varma Century Record : तिलक वर्मा याने टी 20i कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झळकावलं. तिलकने 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह शतक पूर्ण केलं.

1 / 6
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर सेंच्युरियनमध्ये तिसऱ्या टी 20i सामन्यामध्ये 11 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 220 धावांचं आव्हान मिळालं होतं. मात्र त्यांना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 208 धावाच करता आल्या.

2 / 6
शतकवीर तिलक वर्मा हा टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. तिलकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकत काही खास रेकॉर्ड आपल्या नावावर केले.

3 / 6
तिलकने 51 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांसह शतक पूर्ण केलं. तिलकने 56 बॉलमध्ये  7 सिक्स आणि 8 फोरसह 107 नॉट आऊट रन्स केल्या. तिलकने यासह 3 विक्रम आपल्या नावावर केले.

4 / 6
तिलक टीम इंडियासाठी शतक करणारा दुसरा युवा फलंदाज ठरला. तर सर्वात कमी वयात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक करणारा पहिला भारतीय ठरला.

5 / 6
टीम इंडियासाठी कमी वयात शतक करण्याचा विक्रम यशस्वी जयस्वाल याच्या नावावर आहे. यशस्वीने वयाच्या 21 वर्ष 279 व्या दिवशी 2023 साली नेपाळविरुद्ध शतक ठोकलं होतं. तर आता त्यानंतर तिलकने 22 वर्ष 5 व्या दिवशी सेंच्युरी केली.

6 / 6
तसेच तिलकने या शतकासह आणखी एक कीर्तीमान केला. तिलक टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये शतक करणारा 12 वा फलंदाज ठरला.