आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेची तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाचा पहिला सामना हा 20 फेब्रुवारीला होणार आहे. या निमित्ताने आपण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात टीम इंडियासाठी सर्वाधिक सिक्स लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)
टीम इंडियासाठी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम हा माजी कर्णधार सौरव गांगुली याच्या नावावर आहे. गांगुलीने या स्पर्धेतील 13 सामन्यांमध्ये 17 सिक्स लगावले आहेत. (Photo Credit : Wasim Jaffer X Account)
टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या दुसऱ्या स्थानी आहे. पंड्याने 5 सामन्यांमध्ये 10 षटकार लगावले आहेत. तसेच पंड्याने या स्पर्धेच्या इतिहासात 1 अर्धशतकासह 105 धावा केल्या आहेत. (Photo Credit : AFP)
हार्दिक पंड्या याच्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या स्थानी आहे. रोहित शर्मा याने 10 सामन्यांमध्ये 8 सिक्स खेचले आहेत. (Photo Credit : PTI)
टीम इंडियाचा माजी सलामीवीर शिखर धवन चौथ्या क्रमांकावर आहे. 'गब्बर'ने 10 सामन्यांमध्ये 8 षटकार लगावले आहेत. तसेच धवनने या स्पर्धेत 707 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Icc)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या यादीत पाचव्या स्थानी आहे. सचिनने 15 सामन्यांमध्ये 7 सिक्स ठोकले आहेत. तसेच सचिनने 36.75 च्या सरासरीने 441 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)