ICC ODI Ranking : आशिया कप स्पर्धेपूर्वी पाकिस्तानची वनडे रँकिंगमध्ये मोठी झेप, टीम इंडियाची स्थिती काय?

| Updated on: Aug 26, 2023 | 11:32 PM

ICC ODI Ranking : पाकिस्तानने अफगाणिस्तान विरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने खिशात घातली. यासह आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिलं स्थान गाठलं आहे. तर ऑस्ट्रेलियनं संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

1 / 6
अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 3-0 अशी जिंकल्यानंतर पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ आयसीसी वनडे संघ क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचला आहे.

2 / 6
पाकिस्तान सध्या 118 गुण 2575 पॉईंट्सने नवीन आयसीसी वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचे 118  गुण आहेत. पण पॉईंट्स 2714 इतके आहेत.

3 / 6
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलिया सप्टेंबरमध्ये एकूण आठ एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यामुळे पहिलं स्थान गाठण्याची संधी आहे. या आठ सामन्यांपैकी 5 सामने दक्षिण आफ्रिके विरुद्ध, तर भारताविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होईल.

4 / 6
तिसऱ्या क्रमांकावर असलेली टीम इंडिया गुणांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियापेक्षा पाच गुणांनी मागे आहे. न्यूझीलंड 104 रेटिंगसह चौथ्या क्रमांकावर आहे.विश्वविजेता इंग्लंड 101 रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहे.

5 / 6
दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिजने भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका 1-2 ने गमावल्याने सातव्या स्थानावर आहे.

6 / 6
बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.