Team India | टीम इंडियाचे 3 खेळाडू तडकाफडकी निवृत्त, नक्की काय झालं?

| Updated on: Feb 19, 2024 | 5:52 PM

Indian Cricket Team | टीम इंडियापासून दूर असलेल्या 3 खेळाडूंनी अखेर निवृत्त झाले आहेत. निवड समितीने या तिन्ही खेळाडूंना फार संधी दिली नाही. अनेक वर्षांपासून टीमपासून दूर असलेल्या खेळाडूंनी अखेर निवृत्ती घेत कारकीर्दीचा द एन्ड केला.

1 / 5
टीम इंडिया सध्या रोहित शर्मा याच्या नेतृत्वात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. मात्र टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाच्या 3 खेळाडूंनी झटपट निवृत्तीचा निर्णय घेत क्रिकेट चाहत्यांना झटका दिला आहे.

2 / 5
इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज वरुन एरॉन याने निवृत्ती जाहीर केली होती.  वरुणने आपला अखेरचा सामना झारखंड विरुद्ध खेळला. शरीर साथ देत नसल्याने इथेच थांबण्याचा निर्णय घेत असल्याचं वरुणने म्हटलं. वरुन टीम इंडियापासून गेल्या अनेक वर्षांपासून दूर होता. वरुणने टीम इंडियासाठी अखेरचा वनडे सामना हा 2014 साली खेळला होता. तर अखेरची कसोटी 2015 साली खेळली होती.

3 / 5
वरुन एरॉन याच्यानंतर मनोज तिवारी यानेही निवृत्ती जाहीर केली. मनोजने रणजी ट्रॉफी स्पर्धेत 17 फेब्रुवारी रोजी अखेरचा सामना खेळला. मनोजही वरुनप्रमाणे टीम इंडियापासून गेली अनेक वर्ष दूर होता. मनोजने टीम इंडियासाठी वनडे सामना 2015 साली खेळला होता. तर अखेरची टी 20 मॅच 2012 साली खेळला.

4 / 5
मनोज तिवारीनंतर विदर्भाला आपल्या नेतृत्वात रणजी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या टीम इंडियाच्या फैझ फझल यानेही निवृत्ती घेतली. फझल याने एका सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. मात्र दुर्देवाने फैझचा पहिलाच सामना हा अखेरचा ठरला.

5 / 5
या तिन्ही फलंदाजांना आताच्या तुलनेत फार संधी मिळाली नाही. त्यामुळे हे तिघे टीम इंडियापासून दूर लोटले गेले. अखेर या तिघांनी क्रिकेटला रामराम केला आहे.