Virat Kohli चा या 5 विक्रमांवर डोळा, सचिनला पछाडण्याची संधी
India vs Bangladesh Test Series: विराट कोहली बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात फ्लॉप ठरला. विराट 6 धावांवर आऊट झाला. मात्र विराटला 5 विक्रम करण्याची संधी आहे.
1 / 6
विराट कोहली याने 8 महिन्यांनी भारतीय कसोटी संघात कमबॅक केलं. मात्र विराट बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 6 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतरह विराटला या मालिकेतील 3 डावांमध्ये 5 महारेकॉर्ड्स करण्याची सुवर्णसंधी आहे. (Photo Credit : Bcci)
2 / 6
विराटला वेगवान 27 हजार करण्याची संधी आहे. विराटने आतापर्यंत 592 डावांमध्ये 26 हजार 948 धावा केल्या आहेत. वेगवान 27 हजार धावा करण्याचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 623 डावांमध्ये 27 हजार धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci)
3 / 6
विराटला मायदेशात 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करण्यासाठी फक्त 5 धावांची गरज आहे. विराट 5 धावाच करताच 12 हजार आंतरराष्ट्रीय धावा करणारा एकमेव सक्रिय फलंदाज ठरेल. (Photo Credit : Social Media)
4 / 6
विराटने आतापर्यंत कसोटी कारकीर्दीत 8 हजार 854 धावा केल्या आहेत. विराटला 9 हजार धावांचा पल्ला गाठण्यासाठी फक्त 46 धावांची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)
5 / 6
विराटने बांगलादेश विरुद्ध उर्वरित 3 डावात अर्धशतक केल्यास त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद होईल. विराटने 3 अर्धशतक केल्यास मायदेशात त्याच्या फिफ्टीची सेंच्युरी पूर्ण होईल. (Photo Credit : Virat Kohli X Account)
6 / 6
विराटने कसोटीत आतापर्यंत 29 शतकं केली आहेत. विराटला आता ऑस्ट्रेलियाचे दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकण्यासाठी फक्त 1 शतकाची गरज आहे. (Photo Credit : Virat Kohli X Account)