IND vs ENG | टीम इंडिया अफगाणिस्ताननंतर आता इंग्लंड विरुद्ध भिडणार, पाहा वेळापत्रक
India vs England Test Series 2024 | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आयपीएलआधी 5 सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. या मालिकेतील सामने कुठे आणि कधी होणार? जाणून घ्या.
1 / 7
टीम इंडियाने अफगाणिस्तान विरुद्धची 3 सामन्यांची मालिका ही 3-0 अशा फरकाने जिंकली. त्यानंतर आता टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध भिडणार आहेत. एकूण 5 सामन्यांची ही कसोटी मालिका असणार आहे.
2 / 7
टीम इंडियाने पहिल्या 2 सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. यामध्ये विकेटकीपर ध्रुव जुरेल याची पहिल्यांदाच निवड करण्यात आली आहे.
3 / 7
तर बेन स्टोक्स इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे. इंग्लंडने या मालिकेसाठी 3 युवा खेळाडूंना संधी दिली आहे.
4 / 7
इंग्लंड या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2023-2025 साखळीच्या हिशोबाने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. टीम इंडियाला या मालिकेतील काही सामने जिंकून पुन्हा एकदा नंबर 1 होण्याची संधी आहे.
5 / 7
मालिकेतील पहिला सामना हा 25 ते 29 जानेवारी दरम्यान होणार आहे. हा सामना हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान वायझॅग येथे पार पडणार आहे. राजकोटमध्ये 15 ते 19 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे. चौथा सामना 23 ते 27 फेब्रुवारी दरम्यान रांचीत पार पडेल. तर पाचवा आणि अखेरचा सामना हा 7 ते 11 मार्च दरम्यान धर्मशाळा येथे होईल.
6 / 7
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स, टॉम हार्टली, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
7 / 7
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.