टी20 वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने रचला इतिहास, काय केलं वाचा
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत करत टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला 24 धावांनी धोबीपछाड दिला आहे. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने एका विक्रमाची नोंद केली आहे.
1 / 5
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने धडक मारली आहे. सुपर 8 फेरीतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवलं आणि आपलं स्थान पक्कं केलं. या सामन्यात रोहित शर्माने 41 चेंडूत 92 धावांची खेळी केली. असं असतना टीम इंडियाने एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
2 / 5
टीम इंडियाने 2007 मध्ये जेतेपदावर नाव कोरलं होतं. त्यानंतर आतापर्यंत झालेल्या सहा पर्वात काहीच हाती लागलं नाही. आता आठव्या पर्वात पुन्हा एकदा भारताकडे संधी आहे. भारताने पाचव्यांदा टी20 वर्ल्डकप उपांत्य फेरीत जागा मिळवली आहे.
3 / 5
टीम इंडियाची टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी घोडदौड सुरु आहे. आतापर्यंत एकही सामना टीम इंडियाने गमावलेला नाही. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेत टीम इंडियाने एकूण सहा सामने जिंकले आहेत.
4 / 5
टीम इंडियाने पहिल्यांदाच टी20 वर्ल्डकप पर्वात इतके सामने जिंकले आहेत. यापूर्वी टीम इंडिया कधीत एका पर्वात 6 सामने जिंकू शकली नाही. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेने यापूर्वी सहा सामने जिंकले आहेत.
5 / 5
एका पर्वात सर्वाधिक सामने जिंकण्याचा मान दक्षिण अफ्रिकेला मिळाला आहे. दक्षिण अफ्रिकेने या पर्वात 7 सामने जिंकले आहेत. भारताने या पर्वात 6 विजयाची नोंद केली आहे. श्रीलंकने 2009 मध्ये 6, ऑस्ट्रेलियाने 2010 मध्ये 6 आणि 2021 मध्ये ऑस्ट्रेलियाने 6 सामने जिंकले आहेत.