यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज यांच्यात सोशल मीडियावर काय चाललंय?
Yashasvi Jaiswal and Mohammed Siraj: यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज या 2 युवा भारतीय खेळाडूंमध्ये सोशल मीडियावर काय चाललंय? सिराजने यशस्वीला सोशल मीडिया स्टोरीतून काय म्हटलंय? जाणून घ्या.
1 / 6
यशस्वी जयस्वाल आणि मोहम्मद सिराज टीम इंडियाचे 2 युवा खेळाडू.यशस्वीने बॅटिंगने आणि सिराजने बॉलिंगने टीम इंडियाला अनेक सामन्यात विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. मात्र आता या दोघांमध्ये काहीतरी सुरुय.
2 / 6
मोहम्मद सिराज याने सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे. सिराजने या स्टोरीत यशस्वी जयस्वाल याला मेन्शन केलंय.
3 / 6
यशस्वी जयस्वाल याने मोहम्मद सिराज याला बिर्याणी पाठवली होती. सिराजने या बिर्याणीसाठी यशस्वीचे आभार मानले. मात्र सिराजने यासह एक तक्रारही केली आहे.
4 / 6
मोहम्मद सिराज याने इंस्टा स्टोरीत बिर्याणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. "यशस्वी, बिर्याणीसाठी आभारी. पुढच्या वेळेस अस्सल बिर्याणी पाठव, हैदराबादी बिर्याणी", असं सिराजने म्हटलंय. इतकंच नाही, सिराजने यशस्वीला मेन्शनही केलंय.
5 / 6
तसेच मोहम्मद सिराज यानेही आपल्या धारदार बॉलिंगने प्रतिस्पर्धी संघाला जेरीस आणलं आहे. सिराज आणि यशस्वी दोघेही टी 20 वर्ल्ड कप 2024 विजयी संघाचे सदस्य आहेत.
6 / 6
यशस्वीने टीम इंडियाचं कसोटी, वनडे आणि टी20i अशा तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यशस्वीने या तिन्ही प्रकारात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.