विराट-पांड्या नाही तर या खेळाडूने यो यो चाचणीत मिळवले सर्वाधिक गुण? जाणून घ्या

| Updated on: Aug 26, 2023 | 5:20 PM

Yo-Yo Test : आशिया कप स्पर्धेसाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी निवड झालेल्या खेळाडूंना यो-यो फिटनेस टेस्ट अनिवार्य केली आहे. आतापर्यंत बहुतांश खेळाडूंनी ही टेस्ट पास केली आहे. पण एका खेळाडूने या चाचणीत सर्वाधिक गुण मिळवत आश्चर्याचा धक्का दिला आहे.

1 / 8
भारतीय संघ आशिया कप 2023 स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत 2 सप्टेंबरला आहे. पण या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ जोरदार सराव करत असून प्रत्येक खेळाडूची यो-यो चाचणी घेतली जात आहे.

2 / 8
आशिया कप स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्वच खेळाडूंची यो-यो चाचणी अनिवार्य आहे. या चाचणीत पास ठरलेल्या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. चला जाणून घेऊयात यो-यो टेस्टमध्ये कोणी किती गुण मिळवले ते..

3 / 8
पीटीआयच्या वृत्तानुसार, शुबमन गिल यो-यो चाचणीत अव्वल स्थानी आहे. त्याने विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या दोघांना मागे टाकलं आहे. ही दोघंही फिटनेस बाबतीत भक्कम असल्याचं मानलं जातं. पण या दोघांना शुबमन गिलने मात दिली आहे.

4 / 8
संघातील बहुतांश खेळाडूंनी 16.5 ते 18 या टप्प्यातच गुण मिळवले आहेत. पण 23 वर्षीय शुबमन गिल याने यो-यो चाचणीत 18.7 गुण मिळवले आहे. यो-यो चाचणी पास होण्यासाठी 16.5 गुणांची किमान आवश्यकता असते.

5 / 8
जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, तिलक वर्मा, संजू सॅमसन आणि केएल राहुल वगळता आशिया चषक संघातील सर्व खेळाडू यो-यो चाचणीत पास झाले आहेत. आता अजून एक चाचणी होणार आहे.

6 / 8
संजू सॅमसन, प्रसिद्द कृष्णा आणि जसप्रीत बुमराह आयर्लंड दौऱ्यानंतर आज संघात सामील होतील. आशिया चषक 2023 प्रशिक्षण शिबिर 29 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. भारत 30 ऑगस्टला कोलंबोला रवाना होणार आहे.

7 / 8
विराट कोहलीला यो-यो चाचणीत 17.2 गुण मिळाले. याबाबतची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर बीसीसीआयने त्याला तंबी दिली होती. तसेच गुण शेअर करू नका अशी समज इतर खेळाडूंना दिली आहे.

8 / 8
यो-यो चाचणी व्यतिरिक्त शिबिरात लिपिड प्रोफाइल, रक्तातील साखर, यूरिक अॅसिड, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 12 आणि डी, क्रिएटिनिन, टेस्टोस्टेरॉन आणि डेक्सा चाचण्यांसह खेळाडूंची तपासणी केली जाते.