टीम इंडियाकडून इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकांच्या धावांचा विक्रम हा लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. गावसकर यांनी 38 सामन्यांमधील 67 डावात 2 हजार 483 धावा केल्या आहेत.
विराट कोहली तिसऱ्या स्थानी आहे. विराटने 28 सामन्यांमधील 50 डावात 1 हजार 991 धावा केल्या आहेत.
चौथ्या स्थानी टीम इंडियाची 'द वॉल' अर्थात राहुल द्रविड आहे. द्रविडने 21 सामन्यांमधील 37 डावात 1 हजार 950 धावा केल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर गुंडप्पा विश्वनाथ आहे. विश्वनाथ यांनी 30 कसोटीतील 54 डावात 1 हजार 880 धावा केल्या आहेत.
इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाकडून कसोटीत सर्वाधिक कसोटी धावांचा विक्रम हा सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने 32 सामन्यांमधील 53 डावात 2 हजार 535 धावा केल्या आहेत.