World Test Championship | हिटमॅन रोहित शर्माला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये किर्तीमान करण्याची संधी
रोहित शर्माला (Rohit Sharma) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (World Test Championship) सर्वाधिक सिक्स (Most Six) लगावण्याचा विक्रम आपल्या नावे करण्यासाठी 5 सिक्सची आवश्यकता आहे.
1 / 6
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 18-22 जूनदरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या अजिंक्यपदासाठी दोन्ही संघ ट्रॉफी उंचावण्यासाठी कसून सराव करत आहेत. या महत्वाच्या सामन्यात रोहित शर्माला किर्तीमान करण्याची संधी आहे. रोहितला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याची संधी आहे. सध्या हा रेकॉर्ड इंग्लंडच्या बेन स्टोक्सच्या नावे आहे.
2 / 6
इंग्लंडच्या बेन स्टोक्सने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक 31 सिक्स लगावले आहेत. स्टोक्सने 17 सामन्यातील 32 डावात हा कारनामा केला आहे.
3 / 6
रोहित शर्माला हा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी आणखी 5 सिक्सची आवश्यकता आहे. रोहितने 11 सामन्यातील 17 डावात 27 सिक्स लगावले आहेत. त्यामुळे रोहित हा कारनामा करणार का, याकडे सर्व भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
4 / 6
सर्वाधिक सिक्सच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर मयंक अग्रवालचा नंबर आहे. मयंकने 12 सामन्यात 20 डावांमध्ये 18 सिक्स फटकावले आहेत.
5 / 6
चौथ्या क्रमांकावर भारताचा युवा विकेटकीपर फलंदाज रिषभ पंत आहे. रिषभने 11 टेस्ट मॅचमधील 18 इनिंगमध्ये 16 सिक्स मारले आहेत.
6 / 6
पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर आहे. बटलरने 18 सामन्यातील 31 डावात 14 सिक्स लगावले आहेत.