बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच टी20 सामन्यात भारताने मोडला पाकिस्तानचा विक्रम, काय केलं ते वाचा
भारत आणि बांग्लादेश यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने पाकिस्तानच्या नावावर असलेला एक विक्रम मोडीत काढला आहे.
1 / 5
तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशविरुद्ध अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. चला जाणून घेऊयात काय ते
2 / 5
टी20 क्रिकेटमध्ये पाकिस्तानच्या नावावर एक विक्रम होता. 2006 ते 2024 या कालावधी पाकिस्तानने 116 खेळाडूंना मैदानात उतरवलं होतं.आता हा विक्रम भारतीय संघाच्या नावावर झाला आहे.
3 / 5
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मयंक यादव आणि नितीश रेड्डी यांनी भारतीय संघात पदार्पण कलं. या दोघांच्या एन्ट्रीमुळे भारताला हा मान मिळाला आहे. टी20 क्रिकेट इतिहासात सर्वाधिक खेळाडू खेळवण्याचा मान भारताला मिळाला आहे.
4 / 5
टीम इंडियाने 2006 पासून आतापर्यंत एकूण 117 खेळाडूंना टी0 खेळण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मागे टाकत आता पहिलं स्थान भारताने पटकावलं आहे.
5 / 5
भारताने सर्वाधिक 117 खेळाडूंना टी20 क्रिकेटमध्ये संधी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तानने 116, ऑस्ट्रेलियाने 111, श्रीलंकेने 108, इंग्लंडने 104 खेळाडूंना टी20 क्रिकेट खेळण्याची संधी दिली आहे.