Netherland : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत नेदरलँडचा चमत्कार, यापूर्वी तीन वेळा असाच दिला होता दणका

| Updated on: Oct 17, 2023 | 11:30 PM

World Cup 2023, NED vs SA : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुसरा सर्वात मोठा धक्कादायक निकाल लागला आहे. अफगाणिस्ताननंतर आता नेदरलँडने कमाल केली आहे. नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा 38 धावांनी पराभव केला.

1 / 6
नेदरलँडने 43 षटकात 8 गडी गमवून 245 धावा केल्या. तसेच दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 246 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना दक्षिण आफ्रिकेचा डाव गडगडला. दक्षिण आफ्रिकेचा संघ सर्वबाद 207 धावा करू शकला.

2 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत दुसऱ्यांदा आश्चर्यकारक निकाल समोर आला आहे. दिग्गज अशा दक्षिण आफ्रिका संघाला नेदरलँडने पराभूत केलं आहे. त्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ उडाली आहे.नेदरलँडने यापूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत धक्के दिले आहेत. टी20 वर्ल्डकपमध्ये उलटफेर केला आहे.

3 / 6
2009 टी20 वर्ल्डकपमध्ये नेदरलँडने इंग्लंडचा पराभव केला होता. नेदरलँडने हा सामना 4 गडी राखून जिंकला होता.

4 / 6
इंग्लंडला 2014 टी20 वर्ल्डकपमध्येही नेदरलँडने पराभूत केलं होतं. यावेळी इंग्लंडचा 45 धावांनी पराभव केला आहे.

5 / 6
टी20 वर्ल्डकप 2022 मध्ये नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेला पराबूत केलं होतं. हा सामना नेदरलँडने 13 धावांनी जिंकला होता.

6 / 6
अफगाणिस्तानने याच स्पर्धेत दोन दिवसांपूर्वी दिग्गज इंग्लंडचा पराभव केला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडसमोर विजयासाठी 284 धावांचं आव्हान दिलं होतं. पण इंग्लंडचा संघ सर्वबाद 215 धावा करू शकला.  (सर्व फोटो: Twitter)