IPL 2024 : आयपीएलमध्ये या संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार, सर्वात शेवटी गुजरात टायटन्स संघ
आयपीएलचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरु होणार आहे. एकूण 10 संघांमध्ये जेतेपदासाठी चुरस असणार आहे. यावेळी जेतेपदाचा दावेदार कोण? हे पहिल्या तीन टप्प्यात दिसून येईल. दरम्यान आयपीएलमध्ये चौकार षटकारांची बरसात पाहायला मिळणार आहे. प्रत्येक संघात षटकार मारणाऱ्या खेळाडूंचा भरणा आहे. पण आतापर्यंतच्या इतिहासात कोणत्या संघाच्या नावावर सर्वाधिक षटकार आहेत जाणून घेऊयात
1 / 10
मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आयपीएलच्या मागच्या 16 पर्वाचं एकंदरीत गणित पाहिलं तर मुंबई इंडियन्स हा संघ षटकारांच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. मुंबई इंडियन्सने 1548 षटकार मारले आहेत.
2 / 10
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ षटकाराच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या संघाने 1484 षटकार ठोकले आहेत. पण दुसऱ्या क्रमांकावर असूनही मागच्या 16 पर्वात एकदाही जेतेपद मिळालेलं नाही.
3 / 10
षटकाराच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा संघ येतो. या संघानेही पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. आतापर्यंत एकूण 1401 षटकार ठोकले आहेत.
4 / 10
पंजाब किंग्स संघ षटकाराच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. या संघाची जेतेपदाची झोळीही रिकामी आहे. या संघाने मागच्या 16 पर्वात 1393 षटकार मारले आहेत.
5 / 10
कोलकाता नाईट रायडर्स हा संघ पाचव्या स्थानावर आहे. या संघाने 1351 षटकार मारले आहेत. या संघाने दोनदा जेतेपदावर नाव कोरलं आहे.
6 / 10
दिल्ली कॅपिटल्स हा संघ सहाव्या स्थानावर आहे. या संघाच्या नावावर 1213 षटकार आहेत. या संघालाही जेतेपद मिळवता आलेलं नाही.
7 / 10
राजस्थान रॉयल्स या संघाने पहिलं जेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर आतापर्यंत 15 पर्वात जेतेपदाची धडपड सुरुच आहे. आतापर्यंत या संघाने 1123 षटकार मारले असून सातव्या स्थानी आहे.
8 / 10
सनरायझर्स हैदराबाद या संघाने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण गेल्या काही पर्वात या संघाची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. दोन पर्वात अगदी तळ गाठला होता. या संघाच्या नावावर 860 षटकार असून आठव्या स्थानी आहे.
9 / 10
लखनौ सुपर जायंट्स हा संघ षटकाराच्या यादीत नवव्या स्थानावर आहे. या संघाने 230 षटकार मारले आहेत.
10 / 10
गुजरात जायंट्स या संघाने 2022 च्या पर्वात एन्ट्री मारली होती. पहिल्या फटक्यातच जेतेपद मिळवलं होतं. पण षटकाराच्या बाबतीत हा संघ सर्वात तळाशी आहे आणि 203 षटकार आहेत.