निवृत्तीवेळी आर अश्विन आणि कुंबळे यांच्यात जुळून आला असा योग
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ड्रा झाला. या नंतर आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे आर अश्विनच्या निवृत्तीची क्रीडाविश्वात चर्चा रंगली आहे. असं असताना अनिल कुंबळे आणि अश्विन यांच्या निवृ्त्तीत एक योग जुळून आला आहे.
1 / 5
आर अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट निवृत्ती घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 कसोटीच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन संघात नव्हता. डे नाईट सामन्यात त्याला संधी मिळाली. तर गाब्बा कसोटीत त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नाही. पण एडिलेड कसोटी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीचा शेवट ठरली.
2 / 5
आर अश्विनच्या निवृत्तीनंतर क्रिकेटमधील एका युगाचा अंत झाला आहे. अश्विनने 2011 मध्ये कसोटीत डेब्यू केलं होतं. 106 कसोटी सामन्यात 537 विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. अनिल कुंबळेनंतर 500हून अधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
3 / 5
अनिल कुंबळे आणि आर अश्विन यांच्या निवृत्तीवेळी एक योग जुळून आला आहे. अनिल कुंबळे 2008 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर निवृत्तीची घोषणा केली होती. असंच अश्विनच्या बाबतीत झालं आहे.
4 / 5
अनिल कुंबळने आपल्या कसोटी कारकिर्दीत शेवटची विकेट मिचेल जॉनसनची घेतली होती. तर अश्विनने शेवटच्या कसोटीत मिचेल मार्शला बाद केलं. दोन्ही खेळाडू वेगळे असले तर मार्शल हे नामसाधर्म्य आहे.
5 / 5
आर अश्विनने 106 कसोटीतील 200 डावात 537 विकेट घेतल्या आहेत. यात 37 वेळा पाच विकेट घेण्याचा मान मिळवला आहे.