Chess World Cup Final : 18 वर्षीय प्रज्ञानानंद याची यशोगाथा, वडील पोलियो ग्रस्त आणि असा शिकला बुद्धिबळ
Chess World Cup Final : नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने फिड वर्ल्डकप फायनलमध्ये भारताच्या प्रज्ञानानंद याला पराभूत करत जेतेपदावर नाव कोरलं आहे. या सामन्यातील दोन फेऱ्या ड्रॉ झाल्यानंतर टायब्रेकरमध्ये कार्लसनने बाजी मारली.
1 / 6
फिडे बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाच्या लढतीत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानानंदला जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनकडून पराभव पत्करावा लागला आहे. सलग दोन गेम अनिर्णित राहिल्यानंतर गुरुवारी या सामन्याचा निकाल टायब्रेकरमध्ये लागला. चुरशीच्या झालेल्या सामन्यात 18 वर्षीय प्रज्ञानानंदने टायब्रेकरमध्ये गुण गमावले आणि कार्लसनने 45 चालीनंतर सामना जिंकला.
2 / 6
प्रज्ञानानंद यांचे वडील रमेशबाबू बँकेत काम करतात. पोलिओची लागण होऊनही त्यांनी हिंमत न हारता मुलांचे उत्तम संगोपन केले. प्रज्ञानानंदांची मोठी बहीण वैशाली हिला खेळाची आवड होती आणि तिला पाहूनच प्रज्ञानानंद बुद्धिबळ खेळू लागला.
3 / 6
वैशालीची इच्छा होती की प्रज्ञानानंदांनी टीव्हीवर कार्टून पाहू नयेत. यासाठी तिने लहान भावाला बुद्धिबळाचा पट शिकवला. तेव्हा धाकटा भाऊ बुद्धिबळात दैदिप्यमान कामगिरी करेल, याबाबत कल्पना नव्हती.
4 / 6
प्रज्ञानानंद यांच्या यशात त्यांच्या आईचा सुद्धा मोठा वाटा आहे. लहानपणापासूनच त्याला बुद्धिबळाशी संबंधित प्रत्येक स्पर्धेत प्रोत्साहान द्यायची . स्पर्धेला नेण्याची जबाबदारी आईकडे होती. आईने वैशाली आणि प्रज्ञानानंद या दोघांनाही बुद्धिबळात पुढे जाण्यासाठी प्रेरणा दिली.
5 / 6
प्रज्ञानानंद भारतीय बुद्धिबळ ग्रँडमास्टर आहे. भारतातील सर्वात प्रतिभावान बुद्धिबळपटू मानला जातो. वयाच्या अवघ्या 10 व्या वर्षी तो आंतरराष्ट्रीय मास्टर झाला.तसेच वयाच्या 12 व्या वर्षी प्रज्ञानानंद ग्रँडमास्टर झाला. अशी कामगिरी करणारा तो त्यावेळचा दुसरा सर्वात तरुण खेळाडू होता.
6 / 6
नॉर्वेच्या 32 वर्षीय मॅग्नस कार्लसनला विजेतेपदासाठी दोन दिवसांत खडतर सामना करावा लागला. 2021 नंतर प्रथमच विश्वचषक जिंकण्यात कार्लसनला यश आले आहे.