पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत फ्रान्सची झाली नाचक्की, ट्रायथलॉन स्पर्धेपूर्वीच रंगला असा ‘सीन’
पेरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा चौथा दिवस असून फ्रान्स सरकारची नाचक्की झाली आहे. ट्रायथलॉन स्पर्धा रद्द करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जगभरातील देशांसमोर फ्रान्सचं नाक कापलं गेलं आहे. यासाठी कारण ठरली ती सीन नदी...काय झालं ते जाणून घ्या.
1 / 5
फ्रान्सने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे. ओपनिंग सेरेमनी पार पडल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच फ्रान्सने सीन नदीवर ओपनिंग सेरेमनी केली. या माध्यमातून फ्रान्सने जगासमोर आपलं वेगळेपण दाखवलं. पण आता याच सीन नदीमुळे तोंड लपवण्याची वेळ आली आहे. (फोटो-Getty Images)
2 / 5
सीन नदीवर जलतरण स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. मंगळवारी पुरुषांची ऑलिम्पिक ट्रायथलॉन स्पर्धा होणार होती. पण सीन नदीच्या घाण पाण्यामुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही स्पर्धा बुधवारी करण्याचा प्रयत्न आहे. याच दिवशी महिलांचीही स्पर्धा होणार आहे. पण सीन नदीचं पाणी चांगलं असेल तरच स्पर्धा होईल. (फोटो-Getty Images)
3 / 5
मुसळधार पावसामुळे सीन नदीतील बॅक्टेरिया वाढल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी ओपनिंग सेरेमनीवेळी पॅरीसममध्ये जोरदार पाऊस पडला होता. पावसाचा जोर शनिवारी दिसला. (फोटो-Getty Images)
4 / 5
सीन नदीतील पाण्याची गुणवत्ता पाहता रविवारी आणि सोमवारी होणारे ट्रायथलॉन सराव सत्रही रद्द करावे लागले होते. त्यामुळे स्पर्धकांमध्ये आधीच नाराजी आहे. त्यात स्पर्धा पुढे ढकलल्याने आणखी रोष वाढत आहे. (फोटो-Getty Images)
5 / 5
वर्ल्ड ट्रायथलॉनच्या वैद्यकीय पदकाने आणि पॅरिसमधील अधिकाऱ्यांना आशा आहे की, स्पर्धेपूर्वी कडक ऊन पडेल आणि तापमान वाढलं की नदीतील बॅक्टेरिया कमी होईल. (फोटो-PTI)