आयपीएल 2024 स्पर्धेनंतर हे पाच दिग्गज खेळाडू ठोकणार रामराम! वाचा कोणते खेळाडू आहेत ते
आयपीएल 2024 स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. अवघ्या काही आठवड्यांनी आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असून दहा संघ सज्ज आहेत. यंदा आयपीएल स्पर्धेत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. त्यात कोणते खेळाडू चमकदार कामगिरी करतील याचीही चर्चा रंगली आहे. असं असताना काही खेळाडूंसाठी ही आयपीएल स्पर्धा शेवटची ठरू शकते. चला जाणून घेऊयात पाच दिग्गज खेळाडूंबाबत...
1 / 6
आयपीएल स्पर्धा 22 मार्चपासून सुरु होणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर याच वर्षी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे कोणता प्लेयर कुठे आणि कोण खेळणार नाही? याची उत्सुकता आतापासूनच लागली आहे. त्यात काही खेळाडूंची पुढच्या पर्वात खरेदी विक्री होईल की नाही याबाबतही साशंकता आहे. अशी सर्व गणित पाहता पाच खेळाडूंसाठी ही शेवटची आयपीएल स्पर्धा ठरू शकते.
2 / 6
दिनेश कार्तिकसाठी आयपीएल स्पर्धेचं शेवटचं पर्व ठरू शकते. यंदाच्या सिझनमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विकेटकीपर फलंदाज म्हणून उतरणार आहे. 38 वर्षीय दिनेश कार्तिक मागच्या पर्वात काही खास करू शकला नव्हता. दिनेश कार्तिक 2008 पासून खेळत असून हे 17वं पर्व आहे. दिल्ली कॅपिटल्सकडू त्याने पहिल्यांदा पदार्पण केलं होतं.
3 / 6
ईशांत शर्मा सध्या दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे. इशांतसाठी हे शेवटचं पर्व ठरू शकते. आयपीएल 2024 स्पर्धेतून निवृत्तीची घोषणा करण्याची शक्यता आहे. इशानने 2008 मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून पदार्पण केलं होतं. ईशांतने 101 सामन्यात 82 विकेट्स घेतल्या आहेत.
4 / 6
शिखर धवनसाठीही हे शेवटचं पर्व ठरणार आहे. 38 वर्षीय धवनकडे सध्या पंजाब किंग्सची धुरा आहे. आतापर्यंत 217 आयपीएल सामने खेळला असून 35.19 च्या सरासरीने 6616 धावा केल्या आहेत.
5 / 6
महेंद्रसिंह धोनीसाठीही हे शेवटचं पर्व असणार आहे. धोनीसाठी मागचं पर्वच शेवटचं मानलं जात होतं. पण जेतेपदानंतर आणखी एका पर्वात दिसणार आहे. आयपीएल स्पर्धेनंतर मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यावर क्वचितच कोणीतरी डाव लावू शकतो. त्यामुळे यंदाच्या पर्वानंतर तो निवृत्ती जाहीर करण्याची शक्यता आहे.
6 / 6
पियुष चावलासाठीही ही आयपीएल स्पर्धा शेवटची ठरण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पियुष चावला आयपीएल स्पर्धा खेळत आहे. यंदाच्या पर्वानंतर निवृत्ती जाहीर करू शकतो.