World Cup 2023 : टीम इंडियाच्या या जखमी खेळाडूंना मिळणार वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी, कोण ते वाचा
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी भारताचे स्टार असलेले पाच खेळाडू जखमी आहे. त्यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. आता चार खेळाडू संघात परतण्यासाठी सज्ज आहे.
1 / 8
2 / 8
टीम इंडिया मॅनेजमेंट आणि बीसीसीआयने या स्पर्धेसाठी तयारी सुरु केली आहे. पण पाच खेळाडू जखमी असून टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. आता चार खेळाडू परतण्यास सज्ज असल्याची माहिती समोर येत आहे.
3 / 8
ऋषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा जखमी आहेत. ऋषभचं 30 डिसेंबरला अपघात झाला होता. त्याच्यावर सर्जरी झाली असून रिकव्हर होत आहे.
4 / 8
जखमी असलेले पाच खेळाडू बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अॅकेडमीमध्ये तयारी करत आहेत. त्यापैकी चार खेळाडू लवकरच टीम इंडियामध्ये खेळण्याची शक्यता आहे.
5 / 8
बुमराह पाठिच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. त्यामुळे मार्चमध्ये न्यूझीलंडमध्ये सर्जरी झाली होती. आता तो रिकव्हर होत असल्याचं समोर येत आहे.
6 / 8
श्रेयस अय्यर याचीही पाठिच्या खालच्या भागावर सर्जरी करण्यात आली आहे. आता एनसीएमध्ये रिकव्हर होत असून फलंदाजी सुरु केली आहे. बुमराह आणि श्रेयल आयर्लंड दौऱ्यातून संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
7 / 8
केएल राहुल याच्यावरही लंडनमध्ये सर्जरी करण्यात आली आहे. आता तो रिकव्हर होत असून नेट प्रॅक्टिस करत आहे. दुसरीकडे प्रसिद्ध कृष्णा सर्जरीनंतर रिकव्हर होत असून गोलंदाजीचा सराव सुरु केला आहे. हे दोन्ही खेळाडू आशिया कप स्पर्धेत खेळण्याची शक्यता आहे.
8 / 8