आयपीएलच्या 18व्या पर्वापूर्वी मेगा लिलावाची तयारी सुरु झाली आहे. या मेगा लिलावात बरीच उलथापालथ होणार यात शंका नाही. त्यामुळे कोणता खेळाडू सोडायचा आणि कोणाला संघात ठेवायचं याबाबत खलबतं सुरु झाली आहेत. दरम्यान, फ्रेंचायसींनी तीन बदल करण्याचा बीसीसीआयपुढे आग्रह धरला आहे. बीसीसीआयने बुधवारी मेगा ऑक्शनवर फीडबॅक सेशन ठेवलं होतं. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत.
आयपीएल फ्रेंचायसींची सर्वात प्रमुख मागणी मेगा लिलावासंदर्भातील आहे. आयपीएल मेगा लिलाव तीन वर्षांऐवजी पाच वर्षांचा करावा असं सांगण्यात येत आहे. यामुळे अनकॅप्ड खेळाडूंना तयार करता येईल, असं फ्रेंचायसींनी सांगितलं आहे. म्हणजे आता मेगा लिलाव झाला की थेट 2029 मध्ये लिलाव होईल. त्यामुळे फ्रेंचायसींची मागणी बीसीसीआय मान्य करते की नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
फ्रेंचायसींनी मेगा लिलावापूर्वी रिटेन करण्याऱ्या खेळाडूंची संख्या चार वरून सहापर्यंत नेण्याची मागणी केल्याची चर्चा आहे. सध्या चार खेळाडू रिटेन करण्याची परवानगी आहे.
काही फ्रँचायसींनी मेगा लिलावापूर्वी आठ खेळाडूंवर राईट टू मॅचला परवानगी देण्याची विनंती केली आहे. सध्या 3 राईट टू मॅच कार्ड दिले जातात. केकेआरसह काही फ्रँचायझींनी रिटेन ऑप्शनऐवजी आरटीएम पर्याय देण्याची विनंती केली आहे.
बीसीसीआयने आयपीएल फ्रँचायझींच्या या तीन मागण्या पुढे केल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी या महिन्याच्या अखेरीस आयपीएल मालकांसोबत बैठक बोलावण्यात आली असून या बैठकीनंतर मेगा लिलावाची अंतिम रूपरेषा जाहीर होईल.