Team India : भारताच्या या खेळाडूंनी सलग 4 षटकार ठोकण्याची साधली किमया, एका गोलंदाजाचा समावेश
Suryakumar Yadav : ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका टीम इंडियाने 3-0 ने आपल्या खिशात घातली आहे. या सामन्यात सूर्यकुमार यादव याची चमकदार कामगिरी पाहायला मिळाली. सूर्यकुमार यादव याने 37 चेंडूत 6 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. तसेच कॅमरोन ग्रीन याला सलग 4 षटकार ठोकले.
1 / 6
ऑस्ट्रेलिया विरुद्धचा दुसरा सामना टीम इंडियाने 99 धावांनी जिंकला. या सामन्यात शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी शतकी खेळी केली. तर केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी अर्धशतकं झळकावली.
2 / 6
सूर्यकुमार यादव याने 37 चेंडूत 6 उत्तुंग षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 72 धावा केल्या. यात कॅमरून ग्रीनला सलग 4 षटकार मारले. उर्वरित दोन चेंडूवर षटकार मारेल अशी आशा होती. पण तसं झालं नाही. तसेच युवराजच्या पंगतीत बसण्याचा मान मिळाला नाही.
3 / 6
कॅमरोन ग्रीननं संघासाठी 44 वं षटक टाकलं. यातील पहिल्या चार चेंडूवर सलग 4 षटकार ठोकले. तसेच वनडे क्रिकेटमध्ये एका षटकात सलग चार षटकार ठोकणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
4 / 6
झहीर खान याने एकदिवसीय सामन्यात सलग 4 षटकार मारले आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला. 2000 साली झिम्बाब्वेसाठी शेवटचं षटक हेन्री ओलोंगा टाकत होता. यावर तिसऱ्या चेंडूपासून सहाव्या चेंडूपर्यंत बॅक टू बॅक सिक्स मारले.
5 / 6
रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्मा याने षटकरांचे काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आता ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढेल अशी स्थिती आहे. रोहित शर्मा याने 2017 मध्ये सलग 4 षटकार ठोकले होते. हिटमॅनने श्रीलंकेच्या सुरंगा लकमलच्या षटकात सलग 4 षटकार ठोकले होते.
6 / 6
सूर्यकुमार यादव हा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमार यादव याने सलग चार षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात त्याने ही किमया साधली आहे.